कोरोना कमी झालाय, याचे श्रेय औषध विक्रेत्‍यांना; पालकमंत्री गुलाबराव पाटील

कोरोना कमी झालाय, याचे श्रेय औषध विक्रेत्‍यांना; पालकमंत्री गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

जळगाव : सैनिक जसा देशाच्या सीमेवर कोणतीही अपेक्षा न करता सेवा करतो, अगदी त्याच प्रमाणे औषधी विक्रेते देखील निस्वार्थ सेवा करत असतात. कोरोनाच्या आपत्तीमध्ये सगळीकडे हाहाकार माजला असतांना केमिस्ट बांधव अतिशय धाडसाने मैदानात पाय रोवून उभे होते. आज कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून याचे मोठे श्रेय औषधींचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा न पडू देणार्‍या औषधी विक्रेत्यांना जाते असे गौरवोदगार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. (jalgaon-news-Corona-depletion-thanks-to-drug-dealers-Guardian-Minister-Gulabrao-Patil-statment)

जळगाव जिल्हा मेडिसीन डीलर्स असोसिएशनतर्फे केमिस्ट भवनात आयोजीत कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.

गुलाबराव पाटील
त्‍या ४७ भाजप नगरसेवकांना तुरूंगात धाडणार; शिवसेनेचा इशारा

गुलाबराव पाटील यांनी केमिस्ट बांधव आणि त्यांच्या असोसिएशनचे कौतुक केले. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव केला. राजकारणींना बरं म्हटले की, आम्हाला जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते. माणुसकी हीच संपत्ती असणारा माणूस हा सर्वात मोठा असतो. याचा विचार करता केमीस्ट बांधव मानवतावादी कार्य करत असल्याचे ते म्‍हणाले. तर, जिल्ह्यातील केमीस्ट बांधवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही देखील गुलाबराव पाटील यांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com