Corona: धक्‍कादायक..जिल्‍हा कारागृहात १३ कैदी कोरोनाबाधित

धक्‍कादायक..जिल्‍हा कारागृहात १३ बंदिवान कोरोनाबाधित
Corona: धक्‍कादायक..जिल्‍हा कारागृहात १३ कैदी कोरोनाबाधित
Coronasaam tv

जळगाव : जिल्‍हा सामान्य रुग्णालयात जळगाव शहरातील २८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले. जिल्हा कारागृहातील १३ बंदिवांना कोरेानाची लागण झाल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. बुधवारी रात्री त्यांना तातडीने जिल्‍हा सामान्य रुग्णालयात (Jalgaon Civil Hospital) हलविण्यात आले. (jalgaon news corona letest news Thirteen inmates are corona positive in the district jail)

Corona
Jalgaon Corona: सक्रिय रुग्णसंख्या हजारावर; तिसऱ्या लाटेतील पहिला बळी

जिल्‍हा कारागृहातील चक्क १३ बंदिवांनाचा कोरोनाची (Corona) लागण झाल्याने कारागृह प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची एकच तारंबळ उडाली. रात्री नऊच्या सुमारास बाधित कैद्यांना जिल्‍हा सामान्य रुग्णालय दाखल केले आणि तेथून रात्रीतून मोहाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कारागृहात एकूण साडेचारशेवर बंदिवान असून, आता या सर्व बंदिवांनाची जिल्‍हा प्रशासनाला कोरोनाची तपासणी करून घ्यावी लागणार आहे. या सर्व धावपळीत रात्री एक सहा वर्षीय बालकही कोरेानाबाधित (Corona Positive) असल्याचे आढळून आले. त्यालाही दाखल करून घेण्यात आल्याचे जिल्‍हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळाली.

परदेशातून आलेले दहा प्रवाशी पॉझिटीव्‍ह

रेल्वे स्टेशनवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या दरम्‍यान बुधवारी परराज्यातून आलेले दहा प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात ४ महिला व ६ पुरुषांचा समावेश आहे. रेल्वे स्टेशनवर आलेल्या ताप्तीगंगा एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस व कर्नाटक एक्स्प्रेस मधून उतरलेल्या या प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.