जळगाव जिल्ह्यात २५ लाखांवर कोरोना लसीकरण

जळगाव जिल्ह्यात २५ लाखांवर कोरोना लसीकरण
जळगाव जिल्ह्यात २५ लाखांवर कोरोना लसीकरण
Corona Vaccination

जळगाव : जिल्ह्यात रविवारअखेर (ता. १०) २५ लाखांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात लशी उपलब्ध झाल्याने लसीकरणास वेग आला आहे. शहरी भागात दहा लाखांवर, तर गामीण भागात १४ लाखांवर नागरिकांनी लस घेतली आहे. शहरी भागासह जिल्ह्यातील लसीकरण वेगात होण्यासाठी विशेष लसीकरण अभियान सुरू आहे. (jalgaon-news-Corona-vaccination-on-25-lakhs-in-Jalgaon-district)

कोविड संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या दुष्परिणामाचा फटका १४ लाख २७ हजारांहून अधिक नागरिकांना बसला. जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या अथक प्रयत्नातून १४ लाख १५० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. संसर्गावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून राबविली जात आहे. आरोग्य प्रशासन, फ्रंटलाइन वर्कर्स यांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण झाले आहे. त्यानंतर ४५ वर्षे वयोगटासह जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, महावितरण, विद्यापीठ प्रशासन अन्य सर्वसामान्य नागरिक तसेच १८ वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

महिनाभरात पाच लाख लसीकरण

जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात आलेल्या लस मात्रेनुसार ऑगस्टपर्यंत केवळ नऊ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले होते. परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभाग पातळीवर आवश्यक प्रमाणात लस मात्रेच्या पुरवठ्याची मागणी केल्यानुसार लस मात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहे. गेल्या महिन्यात २० लाख २१ हजार ७४५ नागरिकांचे लसीकरण झाले होते. आता तीच संख्या २५ लाखांवर गेली आहे.

Corona Vaccination
कोरोना लस न घेतल्यास दुकाने होणार सील; १५ ऑक्टोबरनंतर शोध मोहीम

आकडे बोलतात..लसीकरण असे

- शहरी भाग---१० लाख ३९ हजार ९८४

- ग्रामीण भाग--१४ लाख ८८ हजार १५०

- जिल्हा एकूण--२५ लाख २८ हजार १३४

Related Stories

No stories found.