जळगाव जिल्हा कोविड रुग्णालय होतेय पूर्ववत ‘सिव्हिल’

जळगाव जिल्हा कोविड रुग्णालय होतेय पूर्ववत ‘सिव्हिल’
जळगाव जिल्हा कोविड रुग्णालय होतेय पूर्ववत ‘सिव्हिल’
Jalgaon civil

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा कोविड रुग्णालय) कोरोनाविरहित उपचारांसाठी (नॉन कोविड) खुले करावे, असा लेखी अभिप्राय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पाठविला होता. त्यावर विचार करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २२ जुलैपासून रुग्णालय पूर्वीप्रमाणे कोरोनाविरहित उपचारासाठी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. (jalgaon-news-coronavirus-ratio-down-and-covid-hospital-again-civil-hospital)

कोरोना महामारीच्या रुग्णांवर मोहाडी येथील महिला रुग्णालयात उपचार होणार आहेत. जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्येचे प्रमाण घटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात नॉन कोविड सुविधा पूर्ववत सुरू करण्याबाबत अभिप्राय तत्काळ कळवावेत, असे पत्र अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविले होते. त्यानुसार १७ जुलैला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाविद्यालयीन परिषदेची बैठक घेण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली साधकबाधक चर्चा होऊन सर्व विभागप्रमुखांनी एकमताने रुग्णालय कोरोनाविरहित रुग्णांसाठी खुले करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला.

Jalgaon civil
राज्यात घराघरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटी : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मोहाडी रुग्णालयातच सर्व सुविधा

कोरोना आजाराच्या रुग्णांना मोहाडी येथील महिला रुग्णालयात उपचार व्हावेत, तेथील आयसीयू विभागात आवश्यकता भासल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचे तज्ज्ञ डॉक्टर पाठवू, मोहाडी रुग्णालयात जागा शिल्लक नसेल तरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्याविषयी विचार व्हावा, कोरोना नसलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सी २ या कक्षातच उपचार सुरू राहतील, असा लेखी अभिप्राय डॉ. रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या सहीनिशी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com