सावधान.. रुग्णवाढ देतेय तिसऱ्या लाटेचे संकेत

सावधान.. रुग्णवाढ देतेय तिसऱ्या लाटेचे संकेत
सावधान.. रुग्णवाढ देतेय तिसऱ्या लाटेचे संकेत
Corona

जळगाव : तिसऱ्या लाटेचे संकेत देणाऱ्या नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात नव्या सहा रुग्णांची भर पडली असून, त्यांपैकी एकट्या जळगाव शहरातील चार रुग्णांचा समावेश असल्याने नागरिकांना हे सावधानतेचे संकेत आहेत. (jalgaon-news-coronavirus-sign-of-the-third-wave-is-giving-rise)

गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत होते. दुसरी लाट ओसरत असताना चार वेळा जिल्ह्यातील दैनिक रुग्णसंख्या शून्य नोंदली गेली. मंगळवारी जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, बुधवारी जिल्ह्याच्या चिंतेत भर घालणारा नव्या सहा रुग्णांचा आकडा समोर आला.

जळगाव शहराला धोका

ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे. अशात जळगावकरांसाठी धोक्याचा इशारा देणारा नव्या बाधितांचा आकडा समोर आला. बुधवारी शहरात चार नवे रुग्ण आढळले, तर भुसावळ व चोपडा तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. विशेष म्हणजे एकही रुग्ण बरा झाला नाही, त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या वाढून २३ वर पोचली आहे.

Corona
बाबा म्‍हणून ओरडली अन्‌ क्षणात आवाज बंद; वाहनाच्‍या धडकेत चिमुकली ठार, आजोबा गंभीर

चाचण्या वाढल्या

बुधवारी दोन हजारांवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. गेल्या काही दिवसांपासून चाचण्याही घटल्या होत्या. मात्र, जशी चाचण्यांची संख्या थोडी वाढली, तशी रुग्णसंख्याही वाढल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून, उत्सवाच्या काळात कोरोना नियमांचे करणे गरजेचे बनले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com