जळगाव जिल्‍ह्यात गंभीर रुग्णांचा आकडा ३०; नवे १३ बाधित

जळगाव जिल्‍ह्यात गंभीर रुग्णांचा आकडा ३०; नवे १३ बाधित
जळगाव जिल्‍ह्यात गंभीर रुग्णांचा आकडा ३०; नवे १३ बाधित
corona

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसरी लाट ओसरण्याच्या स्थितीत पोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आहे. गंभीर रुग्ण घटून अवघे तीसच राहिले आहेत. शुक्रवारी (ता. १३) नवे १३ बाधित आढळून आले, तर २९ रुग्ण दिवसभरात बरे झाले. (jalgaon-news-coronavirus-update-today-13-new-positive-case)

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येने ‘पीक’ गाठल्यानंतर प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. ‘नव्याने बाधित कमी व बरे होणारे अधिक’, असा आलेख कायम असल्याने कोरोना लाट ओसरण्याच्या स्थितीत पोचली आहे. शुक्रवारी नवे १३ बाधित आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ५०० वर पोचली, तर २९ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ७९६ झाला आहे.

गंभीर रुग्ण घटले

ऑक्सिजन बेडसह व्हेंटिलेटर मिळत नसल्याची स्थिती मार्च, एप्रिलमध्ये असताना, शुक्रवारी सक्रिय रुग्ण अवघे १२९ असून, पैकी ६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनवरील २६ व आयसीयूतील पाच असे केवळ ३१ रुग्ण गंभीर आहेत. शुक्रवारी चार हजार ५९४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात जळगाव शहरात दोन, भुसावळ दोन, धरणगाव एक, पारोळा एक, चाळीगाव चार, मुक्ताईनगर एक असे रुग्ण आढळून आले.

corona
मंदिरात देवीच्या मूर्तीचे उघडले डोळे..भाविकांची गर्दी; काय आहे सत्‍य जाणून घ्या

बोदवडला एकही सक्रिय रुग्ण नाही

बोदवड तालुक्यात आतापर्यंत तीन हजार ३२४ रुग्ण होऊन गेले. पैकी तीन हजार २७७ बरे झाले, तर ४७ रुग्णांचा बळी गेला. सद्य:स्थितीत बोदवड तालुक्यात एकही सक्रिय रुग्ण नाही. असे असले तरी बोदवड तालुक्यात आगामी २८ दिवसांत एकही रुग्ण सापडला नाही, तरच तो तालुका कोरोनामुक्त झाल्याचे म्हणता येईल. भडगाव तालुक्यात केवळ एक सक्रिय रुग्ण आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com