सावधान..सॅनिटायझरमध्ये वापरले जातेय जीवघेणे मिथेलॉन

सॅनिटायझरमध्ये विषारी घटक तर नाही ना? याची खात्री करूनच सॅनिटायझरची निवड करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सॅनिटायझर
सॅनिटायझर

जळगाव : कोरोना संसर्गापासून बचावासाठी सॅनिटायझारचा वापर केला जात आहे. मात्र त्यात बचावापेक्षा जीवघेणे मिथेलॉन वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुजरातच्या दोन कंपन्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यामुळे आपण वापरतो त्या सॅनिटायझरमध्ये विषारी घटक तर नाही ना? याची खात्री करूनच सॅनिटायझरची निवड करणे महत्त्वाचे ठरणार आहे. (jalgaon-news-coronavirus-use-sanitizers-but-Methelone-mix-insanitizers)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातदेखील संशयावरून एका बॅचच्या सॅनिटायझरचा वापर थांबविला असून, त्याच्या तपासणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कोणत्याही वस्तूला मागणी वाढली म्हणजे ते पदार्थ बनावट स्वरूपात बाजारपेठेत येतात. कोरोनात सॅनिटायझरची मागणी वाढल्याने बनावट सॅनिटायझर तयार होत असल्याच्या घटना समोर आल्या. जळगावातदेखील वापरण्यात येणारे सॅनिटायझर किती सुरक्षित आहे. याविषयी माहिती घेतली असता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत दोन नमुन्यांमध्ये मिथेलॉन आढळून आल्‍याचे सांगितले.

दोन नमुन्‍यांमध्‍ये आढळले मिथेनॉल

विषाणूपेक्षा मानवी शरीरासाठी घातक घटकाचा वापर सॅनिटायझरच्या परिणामकारकतेच्या खात्रीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दर महिन्याला चार नमुने घेतले जातात. ही तपासणी करताना किरकोळ विक्रेत्याकडे माल जाण्यापूर्वीच वितरकाकडे तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. ही नियमित प्रक्रिया असून या तपासणीदरम्यान जळगावातील एका वितरकाकडे तपासणी करताना दोन नमुन्यांविषयी संशय वाटल्याने त्याचे नमुने घेण्यात आले. त्याच्या तपासणीदरम्यान त्यात इथेलॉन या घटकाऐवजी मिथलॉन आढळून आले. विषाणू नष्ट होण्यासाठी इथेलॉन अर्थात अल्कहोलचे प्रमाण सॅनिटायझरमध्ये आवश्यक असते. मात्र, या नमुन्यांमध्ये विषाणूपेक्षा मानवी शरीरासाठी जीवघेणे ठरणारे मिथेलॉन वापरल्याचे आढळून आले.

सॅनिटायझर
येथे भरतेय अनोखी शाळा..शाळेच्‍या पुढाकारातून शिक्षणाचा नवा पर्याय

शासकिय महाविद्यालयातून देखील नमुने

सॅनिटायझरच्या परिणामकारकतेची खात्री करण्यासाठी तपासणी केली जाते. एका तपासणीत सॅनिटायझरमध्ये इथेलॉनऐवजी मिथेलॉन आढळल्याने संबंधित कंपनीची तपासणी करुन न्यायालयात खटला दाखल केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातदेखील नमुने घेतले असून, संबंधित बॅचच्या सॅनिटायझरचा वापर थांबविला आहे.

एफडीएकडून वेळोवेळी सुचना प्राप्‍त होत असतात. तसेच नवीन आदेशानुसार विभागाकडून तपासणी केली जाते. काही भेसळसारखे आढळल्‍यास नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. यात सॅनिटायझरच्‍या दोन नमुन्‍यांमध्‍ये इथेनॉल एवजी मिथेनॉल आढळून आले आहे.

– अनिल माणिकराव, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com