महिन्याभरात तीन वेळा केंद्र बंद...असे राहिले तर लागतील दोन वर्ष

महिन्याभरात तीन वेळा केंद्र बंद...असे राहिले तर लागतील दोन वर्ष
महिन्याभरात तीन वेळा केंद्र बंद...असे राहिले तर लागतील दोन वर्ष
corona vaccine

जळगाव : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात तीन वेळा लसीकरण केंद्र बंद राहिली. केंद्राकडून कोरोना लसींचा पुरवठा न झाल्याचे कारण आरेाग्य विभागाने दिले असले तरी, अशाच संथ गतीने कोरोना लसीकरण सुरू राहिल्यास अजून दोन वर्ष तरी सर्वांना लसी देण्यास लागतील. तोपर्यंत कोरोना किती जणांचे जीव घेईल हे सांगता येत नाही, अशा खोचक प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. (jalgaon-news-coronavirus-vaccination-center-close-not-available-vaccin)

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना विरोधातील लसीकरणास सुरूवात झाली असली तरी आतापर्यंत ९ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ४४ ते ४५ लाखापर्यंत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरी युवकांना पुरेशा प्रमाणात लसीकरण झालेले नाही. कोरोनाची पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक सर्वाधीक बाधीत झाले होते. दुसऱ्या लाटेत युवा पिढी अधिक बाधीत झाली. आता तिसरी लाट येवू पाहात आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे कोरोना लसीकरण होय. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले त्यांना कोरोना पासून काही अशी धोका नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते. दुसरीकडे केंद्र शासन राज्यांना लसींचा पुरवठा करीत नाही. कोरोना महामारीला थोपवायचे असेल तर लसीकरण हाच पर्याय आहे. त्याला केंद्र व राज्य शासनाने प्राधान्य दिले पाहिजे.

corona vaccine
तेलाचे तळे साचले अन्‌ नागरीकांनी भरल्‍या कॅन

चार वाजेपासून रांगेत रहावे लागतेय उभे

महामारीची लाट आली की ‘लॉकडाऊन’ हा पर्याय होवू शकत नाही. महामारी येणारच त्यावर नवनवीन तंत्रज्ञानाने उपाय करणे गरजेचे आहे. कोरोनावर प्रभावी उपाय लस घेणे हा असल्याचे सर्वांना माहित आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या वाट्याला लसींचा पुरवठा कमी करणे योग्य नाही. ज्या राज्यात भाजपची सत्ता तेथे कॉलनी- कॉलनीत कोरोना लसीकरण शिबिर अभियान राबवून प्रत्येकाला कोरोना लसीकरणाची सक्ती केली जाते. दुसरीकडे जिल्ह्यात पहाटे चार वाजेपासून लसीकरणासाठी रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात आहे. यावर जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन अन विशेषतः पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना जनमानसात आहेत.

लसीकरणाची जिल्ह्याची स्थिती

* पहिला डोस घेतलेले---७ लाख २ हजार ६२

* दुसरा डोस घेतलेले--२ लाख २ हजार ६२३

* एकूण डोस घेतलेले--९ लाख ४ हजार ८६५

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com