Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

Jalgaon News: कापसाला १३ हजार हमीभावसह सबसिडी द्या; महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा रास्‍ता रोको

कापसाला १३ हजार हमीभावसह सबसिडी द्या; महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा रास्‍ता रोको

पारोळा (जळगाव) : शेतकऱ्यांचे हित न जोपासता व्यापारांचा विचार करून देशात कापूस असताना देखील बाहेरून कापूस घेण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात कापसाला भाव (Cotton Price) वाढ मिळत नाही. पर्यायाने शेतकरी (Farmer) कापूस वाढीच्‍या संकटात हवालदील झाला असून राज्य सरकारने याबाबत लक्ष देऊन कापसाला प्रति क्विंटल १३ हजार भाव द्यावा. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागावेत. यासाठी सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शेतकरी संघटनेने उठाव करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको करत विविध मागणीचे निवेदन दिले. (Maharashtra News)

Jalgaon News
Bhandara News: वाघ आला रे आला..शेतकऱ्यांचा जागते रहोचा नारा, वन विभाग म्हणते रात्रीला जंगल परिसरात जावू नका

पारोळा (Parola) येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत पारोळा तालुक्यासह भडगाव व इतर तालुक्यातील शेतकरी पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी रास्ता रोको सहभाग घेतला. यावेळी बाजारपेठ, नगरपालिका चौक, तलाव गल्ली, शिव दरवाजा, कजगाव रस्ता, पोलीस स्टेशन असे मार्गक्रमण करून घोषणाबाजी करत तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वरिष्ठांकडे सदर मागण्याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्याची यावेळी सांगण्यात आले.

कापसाला सबसिडी अदा करा

कापसाला प्रतिक्विंटल १३ हजार हमीभाव मिळावा. तसेच ज्या पद्धतीने इतर योजनेला सबसिडी दिली जाते. त्या पद्धतीने कापसाला सबसिडी अदा करावी. तेलंगाना राज्यात शेतकर्यांना बी-बियाणे व खते घेण्यासाठी थेट बँक खात्यावर दर सहा महिन्याला प्रती एकर पाच हजार रुपये म्हणजेच वर्षाला प्रती एकर १० हजार रुपये ते एक एकर ते पुढे कितीही क्षेत्र असो कोणतीही मर्यादा नाही. या पद्धतीने रयतु बंधू या योजनेअंर्तगत थेट आधार लिंक बँक खात्यात वर्ग केले जातात.

मोफत सौरपंप हवे

शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाना २४ तास वीज द्यावी. तसेच मागेल त्याला सौरपंप अशी योजना राबवून ४८ तासाच्या आत मोफत सौरपंप उपलब्ध करून देण्यात यावा. गिरणा खोरे, नारपार नदी जोड प्रकल्पाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. तेलंगाना राज्याने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना ट्रक्टर योजना सुरु आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी योजना सुरु करावी. पिक विमा नुकसान भरपाई हि अत्यल्प मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची यामुळे फसवणूक झाली आहे . विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना सरसगट प्रती हेक्टर ३८ हजार अशी मिळावी.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com