Jalgaon Crime: लहान भावाचा खून करून मृतदेह फेकला नदीत

लहान भावाचा खून करून मृतदेह फेकला नदीत
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

कासोदा (जळगाव) : सख्ख्या भावानेच लहान भावाचा डोक्यात मुसळ घालून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मजूर असलेल्या दोन्ही भावांमध्ये सतत वेगवेगळ्या कारणाने भांडणे होत असत. लहान भावाच्या जाचाला कंटाळून मोठ्या भावाने घरात पडलेली लोखंडी मुसळीने त्याच्या डोक्यावर वार (Crime) करून ठार केले. त्यानंतर सायकलीवर पोत्यात नेऊन गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले. उत्राण (गुजर हद्द) येथे शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा (Crime News) दाखल झाला आहे. (Jalgaon Crime News)

Jalgaon Crime News
भाजीपाला दुकानात गुटख्याचे घबाड,‌ सट्टापेढी; पावणेआठ लांखाचा गुटखा जप्त

उत्राण (गुजर हद्द) (Jalgaon) येथील भगवान धोंडू महाजन (वय ६२) हा लहान भाऊ सत्यवान महाजन सोबत एकाच घरात राहत होता. दोघेही मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्यात कायमच काहीही कारणावरून किरकोळ वाद होत होते. लहान भावाच्या जाचाला कंटाळून भगवान महाजन याने १२ सप्टेंबरला सकाळी बाथरूममध्ये सत्यवान हा लघुशंकेस जाऊन आला व त्याने त्या ठिकाणी पाणी टाकले नाही. त्यामुळे घरात दुर्गंधी येत होती. हे त्याचे नेहमीचे असल्याने भगवान यास राग (Jalgaon Crime) आल्याने भगवान याने सत्यवान याच्या पाठीमागून घरात पडलेली लोखंडी मुसळीने त्याच्या डोक्यावर मारले व मुसळीने वार करीत राहिला. नंतर त्यास ओढत नेऊन घरातील मागील खोलीत झाकून ठेवले व सायंकाळपासून भगवान हा घरात न राहता ग्रामपंचायतीच्या ओट्यावर न जेवता झोपला.

मध्‍यरात्रीनंतर सायकलीवरून मृतदेह नेत टाकला नदीत

मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान घरात जावून पडलेली जमिनीवर सांडलेले रक्त पुसले. तसेच कापूस भरण्याच्या पोत्यात सत्यवान याचा मृतदेह टाकून त्यास सायकलीवरून गिरणा नदीत वाहत्या पाण्यात फेकून दिले. दरम्यान, शनिवारी (ता. १७) सकाळी दहाला विजय महाजन यांना फोन करून गावाबाहेरील म्हसोबा मंदिराजवळ भेटण्यास बोलवले व गावातील चर्चेबद्दल सांगून या संशयितास कासोदा पोलिसात स्वतः जमा होऊन जा, असे सांगितले. परंतु संशयित हा शेतात निघून गेला व तेथून फरार होण्याच्या मार्गावर होता. उत्राण येथे हत्या झाल्याचे कळताच उपविभागीय पोलिस उपअधीक्षक भारत काकडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

असा झाला खून निष्पन्न

मृतदेह भातखेडे येथील गिरणा नदीच्या काठावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह फुगलेल्या व कुजलेल्या अवस्थेत शुक्रवारी (ता. १६) आढळून आला. भातखेडे येथील धनराज पाटील हे अस्थी विसर्जनासाठी गावातील नदी काठावरील महादेव मंदिराजवळ गेले होते. त्यावेळी त्यांना उंबराच्या झाडाजवळ मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांनी ही घटना उत्राण येथील पोलिस पाटील रेखा पाटील यांना सांगितली.

त्यानंतर रेखा पाटील व गावातील काही मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. या मृतदेहाबाबत त्यांनी कासोदा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या दिवशीच सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केल्यावर तो अकस्मात मृत्यू नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले. कासोदा पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित भगवान महाजन यास अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com