रक्‍कम तपासून देतो म्‍हणून घेतले कार्ड; वृद्धाला गंडवत एटीएम कार्ड बदल
ATM Card

रक्‍कम तपासून देतो म्‍हणून घेतले कार्ड; वृद्धाला गंडवत एटीएम कार्ड बदल

रक्‍कम तपासून देतो म्‍हणून घेतले कार्ड; वृद्धाला गंडवत एटीएम कार्ड बदल

जळगाव : एटीएम सेंटरवर आलेल्‍या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतविले. तसेच तुम्‍हाला नाही समजले तर खात्‍यातील रक्‍कम किती आहे तपासून सांगतो म्‍हणून एटीएम कार्ड घेतले. परंतु, देताना एटीएम कार्ड बदलून दुसरेच कार्ड हाती दिले. नंतर त्याच्या खात्यातून २० हजार रुपये काढून घेतल्‍याची घटना शहरात घडली. (jalgaon-news-crime-news-Card-taken-to-check-the-amount-and-ATM-card-change-for-the-elderly)

ATM Card
माशांपासून चकली, शेव, लोणचे; स्‍थलांतरानंतर आदिवासींचा मत्स्य व्यवसायातुन रोजगार

जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातील रहिवासी टी. आर. महाजन (वय ७०) हे मंगळवारी (२३ नोव्‍हेंबर) सायंकाळी खात्यावर किती रक्‍कम शिल्लक आहे; ते पाहण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गणेश काँलणीतील एटीएम सेंटरवर गेले होते. त्यावेळी तेथे चार– पाच जण थांबलेले होते.

आम्‍ही तपासून देतो म्‍हणून घेतले कार्ड

महाजन यांनी बराचवेळ खात्यावरील शिल्लक तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना शिल्लक समजू शकली नाही. त्‍याच वेळी तेथे असलेल्या अनोळखी लोकांना त्यांच्या एटीएम कार्डाचा कोड नंबर माहिती होऊन गेला. त्यापैकी एकाने प्रयत्न करून पाहतो असे सांगत त्यांच्या हातातून एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर त्यांच्या एटीएम कार्डासारखेच दिसणारे दुसरे कार्ड त्यांच्या हाती सोपवले आणि खात्यावरील शिल्लक मलाही समजत नसल्याचे सांगितले.

घरी येत नाही तोवर वीस हजार काढल्‍याचा संदेश

महाजन घरी परत आल्यावर त्यांच्या खात्यावरून दोन वेळेस ९ हजार ५०० व तिसऱ्यांदा १ हजार असे २० हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार त्यानंतर घरी आलेल्या मुलाला महाजन यांनी सांगितल्यावर त्यांचा मुलगा भूपेंद्र महाजन यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन वडिलांचे एटीएम कार्ड ब्लॉक केले. त्यामुळे त्यांच्या खात्यावर शिल्लक असलेली बाकीची रक्कम वाचली. आज सकाळी महाजन यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com