Breaking..जळगाव पुन्हा हादरले; सलग दुसऱ्या दिवशी खून

जळगाव पुन्हा हादरले; सलग दुसऱ्या दिवशी खून
Breaking..जळगाव पुन्हा हादरले; सलग दुसऱ्या दिवशी खून
Murder case

जळगाव : जळगाव शहरातील सलग दुसऱ्या दिवसाची पहाट खुनाच्या थराराने उजाळली. निमखेडी शिवार परिसरात जन्मदात्याचा खून झाल्यानंतर आज शहरात पुन्हा एक नवीन खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-crime-news-Jalgaon-fight-case-for-the-second-day-in-a-row)

शहरातील घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आंबेडकरनगराच्या बाजूच्या परिसरातील राजू पंडित सोनवणे या व्यक्तीची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान लागोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे

आईला गेले होते भेटायला

राजू सोनवणे हे पत्नी व दोन मुले यांच्यासोबत लक्ष्मीनगरात वास्तव्यस होते. आंबेडकर नगर परिसरात राजू यांच्या आई राहत होते. आईला भेटण्यासाठी रविवारी गेले असता रात्री तेथेच मुक्कमी राहिले. वरच्या मजल्यावर ते झोपले होते. सकाळी खाली आले नाही म्हणून आईने मुलाला वर पाहण्यासाठी पाठविले. यावेळी सदर प्रकार उघळकिस आला.

Murder case
येलदरी, सिद्धेश्वर आणि ईसापुर 98 टक्क्यांवर; गावांना सतर्कतेचा इशारा

सलग दूसरा दिवस खुनाचा

निमखेडी रोड परिसरात एका व्यक्तीला कौटुंबिक वादातून त्याच्याच दोन्ही मुलांनी संपवण्याची भयंकर घटना घडली होती. याप्रकरणी दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. खुद्द जन्मदात्या बापाचा खून करण्याच्या या कृत्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान यानंतर आज शहरात पुन्हा एक खून झाला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com