कौटुंबिक वादातून खून; शालकाच्‍या डोक्‍यात घातला कुऱ्हाडीचा घाव

कौटुंबिक वादातून खून; शालकाच्‍या डोक्‍यात घातला कुऱ्हाडीचा घाव
कौटुंबिक वादातून खून; शालकाच्‍या डोक्‍यात घातला कुऱ्हाडीचा घाव
murder

जळगाव : मुक्ताईनगर येथे कौटुंबिक वादामुळे पत्नी मोहरी गेली. याचा पतीला राग आल्‍याने शालकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. या घटनेमुळे मुक्ताईनगरात खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-crime-news-muktainagar-murder-case-family-matter)

मुक्‍ताईनगर शहरातील कोर्टाजवळ रहाणारा विशाल वामन ठोसरे असे मृत झालेल्‍या युवकाचे नाव आहे. या युवकाच्या बहिणीचे चार वर्षांपूर्वी चुंचाळे (ता.यावल) येथील विजय सावकारे याच्यासोबत लग्न झाला होता. लग्‍नानंतर पती– पत्नीमध्ये सातत्‍याने कौटुंबिक वाद होत होते. या वादातून पत्‍नी माहेरी गेली होती. मात्र, दोघा कुटुंबामध्ये समेट घडवून आला होता. मात्र, विजय सावकारे याच्या डोक्यात राग होता. या दरम्‍यान विजय हा गुरूवारी (ता.१५) सासरवाडीला आला होता. येथे आल्‍यानंतर त्याने गोंधळ घातला.

murder
SSC Result : जळगाव जिल्‍ह्याचा ९९.९४ टक्‍के निकाल; तीन विद्यार्थी अनुत्‍तीर्ण

आईला मुलगा दिसला रक्ताच्या थारोळ्यात

रात्री गोंधळ आटोपल्यानंतर परिवारातील सर्व सदस्‍य झोपले होते. पहाटे विशाल ठोसरेच्‍या आईला जाग आली असता त्यांना मुलगा रक्‍ताच्‍या थारोळ्यात आढळून आला. विशालच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातल्‍याचे आढळून आले. मुलाला रक्‍ताच्‍या थारोळ्यात पाहून आईने हांबरडा फोडला. आवाज आल्‍यानंतर घरातील मंडळी देखील उठले. विशाल ठोसरे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोश केला. दरम्‍यान विजय सावकारे घरात आढळून न आल्याने त्यांनीच हा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून तपास करत आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com