Kidnapping: हजार रुपयांत महिलांनी केली तरुणाची विक्री; ठेकेदाराच्या तावडीतून केली सुटका

हजार रुपयांत महिलांनी केली तरुणाची विक्री; ठेकेदाराच्या तावडीतून केली सुटका
crime
crimesaam tv

जळगाव : येथील जनमत प्रतिष्ठान व शनिपेठ पोलिस यांच्या संयुक्त परिश्रमातून जळगावच्या तरुणाची सोलापूर येथील ऊसतोड ठेकेदाराच्या तावडीतून सुटका झाली. शहरातील मुकेश सैंदाणे यास रोजगार देण्याचे आमिष दाखवत काही महिलांनी सोलापूर (Solapur) येथील ऊसतोड ठेकेदाराच्या ताब्यात देत त्याची परस्पर विक्री केली होती. याबाबत मुकेश सैंदाणे या तरुणाच्या घरी थांगपत्ता लागू देण्यात आला नव्हता. (jalgaon news crime news Womens sell young man for a thousand rupees)

crime
Navapur: गोडाऊनला भीषण आग; इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कोळसा, अग्निशमन दलाचा एक जवान जखमी

मुकेश बेपत्ता झाल्याने तो हरवल्याबाबत त्याच्या भावाने शनिपेठ पोलिस (Jalgaon Police) ठाण्यात तक्रार दिली. सोशल मीडिया (Social Media) व मित्रांच्या माध्यमातून मुकेशचा भाऊ प्रदीप यास तो सांगली जिल्ह्यातील कोगडे येथे असल्याचे समजले. प्रदीप सैंदाणे याने त्वरित जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या कानावर हा प्रकार टाकला. नाले यांनी तातडीने शनिपेठ पोलिस निरीक्षक बळिराम हिरे यांची भेट घेत परिस्थिती कथन केली. पोलिस निरीक्षक हिरे यांनी पंकज नाले, प्रदीप सैंदाणे, पोलिस कर्मचारी प्रकाश पाटील, शरद पाटील या चौघांना सांगली जिल्ह्यात पाठवले.

सहाशे किमीच्‍या प्रवास करत सुटका

सहाशे किलोमीटर अंतर कापत तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने बानेवाडी (ता. जत) येथून मुकेश सैंदाणे यास उसतोड ठेकेदाराच्या (Sugarcane Worker) ताब्यातून सहीसलामत घेण्यात आले. त्याला सुरक्षित जळगाव येथे आणले गेले. याकामी पोलिस उपअधीक्षक विठ्ठल ससे, शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळिराम हिरे, जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश मोहिते, प्रशांत देशमुख, तडवी, शरद पाटील, प्रकाश पाटील, अजिंक्य जाधव स्वप्नरंग संस्थेचे महेश राठी, विजय वानखेडे, हर्षाली पाटील, संजयकुमार सिंग यांनी सर्वांचे आभार मानले. जनमत प्रतिष्ठानतर्फे त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com