Jalgaon: निंबादेवी धरण क्षेत्रात पर्यटकांची गर्दी; नियमांचे मात्र उल्‍लंघन

निंबादेवी धरण क्षेत्रात पर्यटकांची गर्दी; नियमांचे मात्र उल्‍लंघन
Jalgaon News nimba Devi
Jalgaon News nimba DeviSaam tv

जळगाव : जिल्ह्यातील यावल सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले सावखेडा सिम शिवारातील निंबा देवी धरण आहे. (Madhya Pradesh) मध्यप्रदेश व महाराष्ट्र बहुतेक भागातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असल्यावर देखील त्या ठिकाणी पर्यटकांची (Jalgaon) मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. (Jalgaon News Nimba Devi Dam)

Jalgaon News nimba Devi
Jalgaon: पिकांची वाढ खुंटली; किमान दहा दिवस हवा सूर्यप्रकाश

यावल (Yawal) येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीत भोनक नदीच्‍या उगमस्थानी तयार केलेले निंबादेवी धरण सध्या प्रेक्षणीय पर्यटनस्थळ बनले आहे. दमदार पावसामुळे सध्‍या ते ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. गेल्या तीन वर्षापासून या निंबादेवी धरणाला पायरी पद्धतीने बांधणी केल्यामुळे धरण अधिकच आकर्षित झालेले आहे. त्यामूळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येत असून गर्दी होत आहे.

सेल्‍फीचा मोह आवरेना

पूरजन्य परिस्थिती असताना देखील महिला धोकादायक ठिकाणी सेल्फी घेत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा जिल्हाधिकार्यानी लागू केला असताना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com