Amalner Palika: नळजोडणी कापल्याचा राग; मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच ओतले अंगावर पेट्रोल

नळजोडणी कापल्याचा राग; मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच ओतले अंगावर पेट्रोल
Amalner Palika: नळजोडणी कापल्याचा राग; मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच ओतले अंगावर पेट्रोल
Amalner Palikasaam tv

अमळनेर (जळगाव) : पालिकेची थकबाकी असल्यामुळे नळजोडणी कापल्याचा राग आल्याने एका नागरिकाने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच अंगावर पेट्रोल टाकून घेतल्याची घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. (jalgaon news cutting the pipe connection Petrol was poured on the body in the room of the amalner palika ceo)

Amalner Palika
Crime News: मुलाने आईवर केला चाकूने वार

अमळनेर (Amalner) शहरातील प्रबुद्ध कॉलनीतील मिलिंद अवसरमल या नागरिकाकडे पालिकेची पाच ते सात वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टी अशी सुमारे ६० हजाराची थकबाकी आहे. त्यामुळे पालिकेच्या (Amalner Palika) वसुली पथकाने त्यांच्या घराची नळजोडणी कापली. त्याचा राग आल्याने मिलिंद अवसरमल यांनी सोमवारी (१० जानेवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास पत्नी व मुलीला सोबत घेऊन पूर्वसूचना न देता मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या दालनात प्रवेश करून अंगावर पेट्रोल (Petrol) टाकत आत्मदहनाची धमकी दिली.

पोलिस ठाण्यात केले जमा

मुख्‍याधिकारी सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी, करनिरीक्षक जगदीश पदमार यांच्यासह काही कर्मचाऱ्यांनी त्याला अमळनेर पोलिस ठाण्यात जमा केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी मिलिंद व त्याच्या कुटुंबीयांनी माफी मागितली. तसेच त्याने पोलिस (Police) ठाण्याला लेखी दिल्याने त्याला ताकिद देऊन सोडण्यात आले.

थकबाकीसाठी नागरिकांनी कोणतेही स्टंट करून प्रशासनाला घाबरविण्याचे प्रयत्न करू नये, त्यांना प्रशासन बळी पडणार नाही. यापुढे असे प्रकार झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, नगरपालिका अमळनेर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com