Cyber Crime
Cyber Crime

धक्‍कादायक..फेसबुकवरुन कुटूंबाचे फोटो काढून ब्लॅकमेलींग

धक्‍कादायक..फेसबुकवरुन कुटूंबाचे फोटो काढून ब्लॅकमेलींग

जळगाव : शहरातील एका तरुणाच्या फेसबुक खात्यावरुन त्याच्या कौटूंबिक फोटो पैकी पत्नी व आईचे फोटो डाऊनलोड करुन त्याचे अश्लील मिम्स्‌ तयार करुन तरुणाची ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हजार रुपयांच्या खंडणीपासुन पैसे उकळत सतत पैशांच्या मागणीला कंटाळून पिडीताने माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. (jalgaon-news-cyber-crime-facebook-account-family-photo-download-and-blackmalling)

फेसबुकवर खाते असलेल्या एका सामान्य कुटूंबातील तरुणाने अपलोड केलेले फोटो एका भामट्याने डाऊनलोड करुन त्यात छेडखानी केली. घरंदाज कुटूंबाचे फोटो काढून ते अश्लाख्य करुन बनावट फोटो त्या तरुणाच्या मोबाइलवरील व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर त्याने पाठवले. याबाबत माहिती देण्यासाठी पलीकडून त्या विकृताने २ सप्‍टेंबरला संपर्क केला. फोन घेतला नाही म्हणुन नंतर, काही वेळाने व्हाटसअ‍ॅप तपासले असता त्याच्या पत्नी व आईचा छेडखानी केलेला बनावट अश्लील फोटो दिसला. तो फोटो बघून त्या तरुणाला धक्काच बसला. त्या फोटो सोबत एक हजार रुपयांची मागणी करण्यात आलेला मजकूर लिहून आला होता. त्याच मोबाईल क्रमांकावरुन त्या तरुणाला पुन्हा फोन आला. पलीकडून हिंदीत बोलणा-या त्या इसमाने त्याला धमकी दिली की या क्रमांकावर फोन पेच्या माध्यमातून एक हजार रुपये पाठव; अन्यथा तुझ्या पत्नी व आईचे फोटो व्हायरल केले जातील. पलीकडून फोनवर मिळालेली धमकी ऐकून सदर तरुण घाबरला. त्याच्या मोबाईलमधे फोन पे अ‍ॅप नसल्यामुळे त्याने चुलत भावाच्या मोबाईलद्वारे हजार रुपये पाठवले.

ते फोटो वेबवर..

त्यानंतर भेदरलेल्या त्या तरुणाने तो, फोन क्रमांक ब्लॉक केल्यावर चवताळलेल्या भामट्याने विविध चार क्रमांकावरुन सतत फोन करुन तिन हजार रुपयांची मागणी करत तरुणाला हैरान करुन सोडले. आता आपल्याकडे पैसे नाही असे सांगत त्रस्त तरुणाने पलीकडून बोलणा-याला नकार दिला. त्यानंतर पलीकडून बोलणा-याने त्या तरुणाला अश्लिल फोटो, अश्लिल मजकुर आणि एक सोबत एक लिंक पाठवली. त्या लिंक वर क्लिक केले असता त्याला त्याच्या पत्नीचे वेबसाईटवर अपलोड केलेले अश्लील फोटो दिसून आले. त्या फोटोच्या खाली एक मजकूर लिहिलेला होता.

Cyber Crime
कोयना धरण व्यवस्थापनाचा नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा

त्रास वाढतच होता

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, संशयीताचा त्रास वाढल्याने त्रस्त तरुणाने माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांची भेट घेत व्यथा कथन केली. पिडीत तरुणाच्या तक्रारीवरुन सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सायबर पोलिस तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com