विमा कंपनीतील ऑफरच्‍या कॉलला भुलले; ९५ हजारात फसवणुक

विमा कंपनीतील ऑफरच्‍या कॉलला भुलले; ९५ हजारात फसवणुक
विमा कंपनीतील ऑफरच्‍या कॉलला भुलले; ९५ हजारात फसवणुक
online fraud

जळगाव : खासगी कंपनीत अभियंता असलेल्या गृहस्थाला मॅक्स लाईफ इंन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ९५ हजारात ऑनलाईन गंडवल्याची घटना घडली. जिल्‍हापेठ पोलिसात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon-news-cyber-crime-Forget-the-call-from-the-insurance-company-95-thousand-fraud)

online fraud
अवकाळी पाऊस..द्राक्ष बागेचे लाखो रुपयांचे नुकसान

शहरातील रामचंद्र अपार्टमेंटमधील रहिवासी तसेच सुप्रीम इंडस्ट्रीज येथे अभियंता पदावर कार्यरत रमेश लक्ष्मीनारायण मुंगड (वय ५१) यांना १० नोव्‍हेंबरला दुपारी मोबाईलवर एका महिलेचा फोन आला. मॅक्स लाईफ इंन्शुरन्स कंपनीतून श्वेता शुक्ला बोलत असल्याचे फोन करणाऱ्या तरुणीने मुंगळ यांना सांगितले. त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचा अचुक नंबर सांगत ती, प्री मॅच्युअर झाल्याचे ती म्हणाली. पॉलिसी विड्रा करण्यासाठी पैसे भरल्यावर तीस दिवसांच्या आत तुम्हाला खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येईल असे सांगत मुंगड यांचा विश्वास संपादन केरुन मुंगड यांना पॉलिसीचे पैसे भरण्यास भाग पाडले.

स्‍क्रीन शॉट मागितल्‍याने संशय

उशिर नको म्हणुन दुसऱ्याच दिवशी मुंगड यांनी ९५ हजार रुपये संबधीत बँक खात्यात ऑनलाईन वर्ग केले. ट्रान्‍सफर केलेल्या रकमेसंदर्भात स्क्रीन शॉट मागितल्याने रमेश मुंगड यांना शंका आली. तत्काळ त्यांनी मॅक्स लाईफ इन्शुरन्सला फोन करुन चौकशी केली असता. कुठलाच प्रिमियम जमा झालेला नसुन तेथून फोनच करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले. आपली श्वेता शुक्ला नावाच्या तरुणीने ९५ हजारात फसवणुक केल्याची खात्री झाल्यावर मुंगड यांनी जिल्‍हापेठ पेालिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरुन रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com