Jalgaon Online Fraud: क्रिप्टो करन्सीच्या नावे तरुणाची फसवणूक; तब्‍बल १५ लाख ३५ हजार केले गडप

Jalgaon Fraud Crypto Currency: क्रिप्टो करन्सीच्या नावे तरुणाची फसवणूक; तब्‍बल १५ लाख ३५ हजार केले गडप
Online Fraud Cyber Crime
Online Fraud Cyber CrimeSaam tv

जळगाव : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून त्यात नफा मिळवण्याचे आमिष देत (Jalgaon) जळगाव शहरातील देवीदास कॉलनी येथील तरुणाची तब्बल १५ लाख ३५ हजारांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

Online Fraud Cyber Crime
Jalgaon News: वडीलांना मुलाने पाहिले अन्‌ घरात आक्रोश; ट्रॅफिक वॉर्डनने संपविले जीवन

जळगाव शहरातील देवीदास कॉलनीत पवन बळिराम सोनवणे (वय २५) हा तरुण वास्तव्यास आहे. १२ ते २२ एप्रिल २०२३ दरम्यान पवन यास व्हॉट्सॲप तसेच टेलिग्राम या सोशल मीडिया साइटवर अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधत अनोळखी व्यक्तींनी पवनला भूलथापा देत विश्वास संपादन केला. तसेच (Cyber Crime) क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा प्राप्त करून देतो, असे आमिष, तसेच खोटे आश्वासन संबंधितांनी दिले.

Online Fraud Cyber Crime
Ulhasnagar News: जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित दादाच; उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स

ऑनलाइन स्‍वीकारली रक्‍कम

पवन याच्याकडून संबंधितांनी वेळोवेळी तब्बल १५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन स्वीकारली. त्या मोबदल्यात कोणतीही रक्कम पवन यास परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पवन सोनवणे याने याबाबत मंगळवारी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अनोळखी क्रमाकांवरून संपर्क साधणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर पुढील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com