किडन्या विका पण जळगावचे रस्ते करा..; नागरीकांनी दर्शवली तयारी

किडन्या विका पण जळगावचे रस्ते करा..; नागरीकांनी दर्शवली तयारी
किडन्या विका पण जळगावचे रस्ते करा..; नागरीकांनी दर्शवली तयारी

जळगाव : गल्लीबोळा पासुन ते प्रमुख रस्ते अंडरग्राऊंड ड्रेनेज, कधीही संपत नसलेल्या अमृत योजनेसाठी खोदुन टाकले आहेत. रस्त्यांचे भांडवल करत आमदार निवडून आले तरी रस्त्यांचे भाग्य उजळले नाही, रस्त्यांमुळे अनेकांना कंबर,पाठ,मानेचे आजार जडले..आता आमच्या किडन्या विका आणी त्यातून शहराचे रस्ते तयार करा असे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक गुप्ता यांच्यासह बारा नागरीकांनी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत आणि मनपा आयुक्तांना दिले आहे.

जळगाव शहराच्या रस्त्यांचा विषय गेल्या देान वर्षा पासुन ऐरणीवर आहे. निवेदने देऊन अंदेालने करुन केवळ आश्वासनेच पदरी पडत असल्याने आज चक्क माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक गुप्ता, शिवलाल पाटिल यांच्यासह चक्क बारा नागरीकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन तयार करण्यात आले. या निवेदनात नमुद केल्या प्रमाणे, जिल्‍हा प्रशासन महापालिकेने आमच्या किडन्या विकाव्यात त्यातून जो निधी उपलब्ध होईल त्यातून जळगावचे रस्ते तयार करावे अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकारी ठेकेदार, नगरसेवक यांच्या मिलीभगत मुळे मनपात मोठा भष्ट्राचार होतो..आमच्या किडन्याविकुन गोळा होणार्या निधीत भष्ट्राचार हेाणार नाही याचीही दक्षता घ्यावी असा गंभीर आरेापांचा आशय नमुद करण्यात आला आहे.

..त्यांचे भाग्य उजळले रस्तेमात्र तसेच

शहरात गल्ल्यांपासुन ते प्रमुख रस्त्यांवर खड्डे झालेले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक आमदार राजूमामा भोळे रस्ते बनिवण्याचे आश्वासन देवून निवडून आले..त्यांचे भाग्य उजळले रस्ते मात्र होते त्यापेक्षाही दयनिय अवस्थेत पेाहचले त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली परंतू अद्यापपर्यंत जळगावात चांगले रस्ते झालेच नाही. लोकप्रतिनीधी, नगरसेवक आणि मनपाच्या अधिकार्यांची मिलीभगत असुन प्रत्येक ठेका नगरसेवकांच्याच माणसांना कसा मिळतो, नाहीच मिळाला तर..दुसरा ठेकेदार कामच करु शकत नाही.सर्वच ठेके निघतात..भष्ट्राचारही मोठ्या प्रमाणावर घडवुन आणला जातो...रस्त्यावर मात्र काही उपाय निघत नाही. याबाबत वारंवार विचारना केली असता महापालिका प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात.

अमृत केले खड्डे

शिवाजीनगर हुडको भागात २० वर्षांपुर्वी घरे बांधून लाभार्थ्यांना घरे देण्यात आली. परंतु या भागातही रस्ते नाहीत. दुसरीकडे महानगरपालिकेला शंभर कोटी पैकी ४२ कोटी देऊनही मनपाने दिलेल्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. अमृत योजना आणि भुयारी गटारींसाठी गल्लीपासून मुख्य रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले. ठेकेदारांनी खोदलेले रस्ते मात्र, बुजवलेच नाही. त्यातूनच पावसाळ्या दरम्यान परिस्थीती चिघळली. महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांना वांरवार निवेदने देऊनही उपयोग होत नाही.

किडन्या विका पण जळगावचे रस्ते करा..; नागरीकांनी दर्शवली तयारी
सोनपेठ तालुक्यातील बलात्कार प्रकरणी ‘त्या’ तिन्ही आरोपींना अटक!

आता किडन्या घ्या..

कर भरूनही रस्त्यांची सुविधा मिळत नाही. माझी किडनी विकून जळगाव शहरातील रस्ते तयार करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्यासह परिमल पटेल, मतीन पटेल, चैतन्य कोल्हे, मंदार कोल्हे, संजय पाटील, सिद्धार्थ सोनाळकर, अमोल कोल्हे ,अनिल नाटेकर, सुरेश पांडे, शिवराम पाटील, किरण ठाकूर, ललित शर्मा, युसूफ पिंजारी अशा बारा नागरीकांच्या स्वाक्षऱ्या असलेल निवेदन आणि किडनीचे प्रातिनीधीक चित्र जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी स्वीकारले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com