Corona: आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्‍यू; तिसऱ्या लाटेतील तिसरा बळी

आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्‍यू; तिसऱ्या लाटेतील तिसरा बळी
Corona death
Corona deathsaam tv

जळगाव : कोरोनाच्‍या तिसऱ्या लाटेचे थैमान जिल्‍ह्यात सुरूच आहे. तिसऱ्या लाटेतील बाधितांचा फारसा धोका नसल्‍याचे सांगितले जात असले तरी या लाटेतील जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेतील कोविड हा तिसरा मृत्‍यू (Corona Death) आहे. (jalgaon news Death of another corona sufferer The third victim in the third wave)

Corona death
Jalgaon Politics: शिवसेनेचे गुपचूप नाही, सर्व काही समोरासमोर; चंद्रकांत पाटलांची खडसेंवर टीका

कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) दिवसेंदिवस पसरत आहे. बाधितांचा आकडा रोज वाढत असून, जिल्‍ह्यातील (Jalgaon) ॲक्‍टीव रूग्णांची संख्‍या तीन हजाराच्‍यावर पोहचली आहे. यामुळे जिल्‍ह्याची चिंता वाढली आहे. कोरोनाच्‍या (Corona) दुसऱ्या लाटेने जिल्‍ह्यात चांगलेच थैमान मांडले होते. त्‍या तुलनेत तिसऱ्या लाटेतील परिणाम कमी आहे. परंतु, आजच्‍या बाधिताच्‍या मृत्‍यूने व वाढत्‍या बाधितांच्‍या संख्‍येने पुन्‍हा चिंता वाढली आहे.

मृतास मधुमेह, हृदयाचा त्रास

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भुसावळ (Bhusawal) येथील सदाशिव पाटील नगरातील एका ५३ वर्षीय इसमास कोरोना उपचारासाठी गुरुवारी रात्री दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्‍याचा मृत्‍यू झाला. मृत व्‍यक्‍तीस मधुमेह तसेच हृदयाशी संबंधित आजार असल्याने व कोरोना अधिक पसरल्याने काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाल्‍याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com