राणे बंधुवर गुन्हा दाखलची मागणी; जळगाव शिवसेना महानगरतर्फे शहर पोलीसात निवेदन

राणे बंधुवर गुन्हा दाखलची मागणी; जळगाव शिवसेना महानगरतर्फे शहर पोलीसात निवेदन
शिवसेना
शिवसेना

जळगाव : भाजपचे आमदार नितेश राणे व खासदार निलेश राणे हे बंधू सातत्‍याने कुरघोडी करत असतात. यातच नितेश राणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्‍याबद्दल अपशब्‍द काढले. या विरोधात शिवसेनेने आंदोलन करत जळगाव शिवसेना महानगरतर्फे राणे बंधुवर गुन्हा दाखलची मागणी केली आहे. (jalgaon-news-Demand-for-filing-a-case-against-Rane-brother-Jalgaon-Shiv-Sena-Mahanagar-to-city-police)

शिवसेना
पारोळ्यात जाळला आमदार राणेंचा पुतळा; गुन्‍हा दाखल करण्याची मागणी

भाजपचे पदाधिकारी आमदार नितेश राणे व खासदार निलेश राणे हे सातत्याने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबतीत सोशल माध्यमातून नेहमी अर्वाच्य व शिवराळ भाषेचा वापर करून त्यांच्यावर टीका करत असतात. त्यामुळे सायबर क्राईम कायद्यान्वये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन त्वरित त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.

सोशल मिडीया अकाउंट बंद करा

गुन्‍हा दाखल करण्याच्‍या मागणीसह राणे बंधू त्यांचे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप आदी सामाजिक माध्यमे बंद करण्यात यावी; अशी मागणी जळगाव शिवसेना महानगर व शिवसेना महिला आघाडीतर्फे करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलीस स्थानकात निवेदन देऊन करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे देखील निवेदनात सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com