
जळगाव : जळगाव शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून, डेंग्यू सदृश्य आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. यात (Jalgaon) जळगावपासुन जवळच असलेल्या शिरसोली गावात देखील डेंग्युने (Dengue) थैमान घातले असून, एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे. याशिवाय गावात डेंग्यू पॉझिटिव्ह आणखी रुग्ण आहेत. (Maharashtra News)
शिरसोली प्र. बो. (ता. जळगाव) येथील देवेंद्र विकास बारी असे मयत तरुणाचे नाव आहे. देवेंद्र हा तरुण गवतील बारीनगरातील पाण्याच्या टाकीजवळ कुटूंबीयासह वास्तव्यास होता. मागील काही दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आजाराला गुण येत नसल्याने आणि ताप उतरत नसल्याने डॉक्टरांनी रक्त लघवीसह सर्व तपासण्या सुरु केल्या. यात डेंग्यू आजाराचे निदान झाले. प्रकृती खालावल्याने देवेंद्रला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र दरम्यान गुरुवारी (१४ सप्टेंबर) पहाटे तीनला खासगी रुग्णालयात देवेंद्रचा मृत्यु झाला.
कुटुंबाचा आक्रोश
देवेंद्रचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मयत देवेंद्र हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. मृत्युची बातमी गावात कळताच ग्रामस्थांना धक्का बसला. गावातील आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. डेंग्युच्या मृत्युमूळे ग्रामपंचायतकडून औषध फवारणीसह साफसफाई सुरु करण्यात आली.
शिरसोलीत आणखी तीन डेंग्यूबाधित
शिरसोली गावातील देवेंद्र बारी या तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा जागे झाली आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी आशा-अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावात सर्वेक्षण सुरु करण्यात आले असता दिवसभरात आणखी तीन बालके डेंग्यूबाधित असल्याचा अहवाल आला असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.