Jalgaon: धरणगाव तालुक्यात शिवसेनेला धक्‍का; शिंदे गटातील गुलाबराव पाटलांसोबत जाणार

धरणगाव तालुक्यात शिवसेनेला धक्‍का; शिंदे गटातील गुलाबराव पाटलांसोबत जाणार
Jalgaon News Shiv Sena
Jalgaon News Shiv SenaSaam tv

धरणगाव (जळगाव) : धरणगाव तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, युवा सेनेचे शहरप्रमुख व तालुका प्रमुखांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राजीनामे देत नेते (Gulabrao Patil) गुलाबराव पाटील यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश करून आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Jalgaon News Gulabrao Patil)

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, धरणगाव शिवसेना शहरप्रमुख राजू महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, पाळधी येथील युवा शहरप्रमुख आबा महाजन, युवा सेनेचे धरणगाव तालुकाप्रमुख बंटी पाटील व बोरगावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नितीन पाटील यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांसह आज राजीनामे दिले. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे हे सर्व राजीनामे पाठविण्यात आले आहेत. या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com