विरोधक दुषित वातावरण करताय; पण हेच काय पुढचे पाच वर्ष सरकार राहिल : दिलीप वळसे– पाटील

विरोधक दुषित वातावरण करताय; पण हेच काय पुढचे पाच वर्ष सरकार राहिल : दिलीप वळसे– पाटील
विरोधक दुषित वातावरण करताय; पण हेच काय पुढचे पाच वर्ष सरकार राहिल : दिलीप वळसे– पाटील
दिलीप वळसे– पाटील

चोपडा (जळगाव) : मी राजकीय गोष्टी बोलत नाही. परंतु विरोधी पक्षाच्यावतीने एक वातावरण तयार करायचा प्रयत्न केला जात आहे. राज्यामध्ये सरकारच नाही, राज्यात काही कळतंच नाही! हे जाणून बुजून आपल्या राज्यामध्ये दूषित वातावरण तयार करण्याचे काम केले जात आहे. हे सरकार पूर्ण ५ वर्ष काम करेल, पुढील ५ वर्षात सुद्धा हेच सरकार निवडून येईल. मागील काळात अडचणींचा सामना करावा लागला. तशा परिस्थितीतही आपण लोकांना विश्वास दिला. तरीही राज्यात सरकारच नाही; राज्यात काही कळतंच नाही! असे वातावरण निर्माण करण्याचे काम विरोधक करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. (jalgaon-news-Dilip-Walse-Patil-statement-Opponents-create-But-the-government-will-be-for-the-next-five-years)

दिलीप वळसे– पाटील
पित्याच्या पावलावर पाऊल; सुनील शेट्टीच्‍या नातीचा रोल साकारतेय दोनगावची ‘निर्भया’

चोपडा (Chopda) शहरासाठी ६५ कोटींची नूतन पाणीपुरवठा योजना अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ यांचा उद्घाटन सोहळा आज (ता. २०) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यानंतर शहरातील यावल रोडवरील मंगल कार्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्‍यक्षस्‍थानी होते. तर व्यासपीठावर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse), विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील आदी उपस्थित होते.

कोरोना संकटातही अपेक्षांना खरे उतरलो

महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार आल्यानंतर कोरोनाचे संकट उभे राहिले. तरी देखील राज्यातील जनतेच्या अनेक अपेक्षाना सरकार खरे उतरले आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे काम करेल आणि पुढचं सरकार देखील महाविकास आघाडीचेच असेल. उत्तर महाराष्ट्र पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलवून आज आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्री वळसे– पाटील म्हणाले, की ६४ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेतून पालिकेतील नगरसेवकांनी शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडविला आहे. योजनेचे बरेच काम झाले आहे उर्वरीत काम लवकर होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.