‘स्क्रीनटाइम’ न पाळल्याने मुले बनताय चिडखोर; मोबाईल, टीव्हीचा परिणाम

‘स्क्रीनटाइम’न पाळल्याने मुले बनताय चिडखोर; मोबाईल, टीव्हीचा परिणाम
‘स्क्रीनटाइम’ न पाळल्याने मुले बनताय चिडखोर; मोबाईल, टीव्हीचा परिणाम

जळगाव : दीड वर्षापासून घरात बसलेल्या मुलांची अवस्था बिकट झालीय. ऑनलाइन शिक्षणासह विविध गेम्सच्या नादी लागल्याने मोबाईल, लॅपटॉप आणि रात्री टीव्ही असे दिवसातील आठ- दहा तास स्क्रीनसमोर असल्याने विद्यार्थी चिडखोर बनत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे पालक व शिक्षकांसमोर मुलांचा ‘स्क्रीनटाइम’ पाळण्याचे मोठे आव्हान उभे आहे. (jalgaon-news-effect-of-mobile-and-TV-Adherence-to-screentime-makes-children-irritable)

सध्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ स्क्रीनसमोर जातोय. दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये कोरोनामुळे बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणात व्यस्त मुलांच्या डोळ्यांसमोर दिवसभरातील पाच- सात तास मोबाईल किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप असतो. ऑनलाइन लेक्चर्स झाले, की होमवर्क आणि रात्री वेळ मिळाल्यावर टीव्हीचा स्क्रीन असा या विद्यार्थ्यांचे सध्याच शेड्यूल.

मुलं बनतांय चिडखोर

दिवसातील १२ पैकी किमान आठ ते दहा तास विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या स्क्रीनसमोर. त्यामुळे मुलांमध्ये वेगवेगळे परिणाम दिसू लागले आहेत. मुलांची चिडचिड वाढणे हा त्याचाच परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

पालकांसह, शिक्षकांसमोर आव्हान

विद्यार्थ्यांना स्क्रीनव्यतिरिक्त शैक्षणिक उपक्रमात गुंतवून न ठेवण्याचे आव्हान पालकांसह शिक्षकांसमोर आहे. इंटरनेटच्या दोन्ही बाजूंचे परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, स्क्रीनटाइमची वेळ पाळणे आदी गोष्टींवर पालकांना नियंत्रण ठेवावे लागणार आहे.

‘स्क्रीनटाइम’ न पाळल्याने मुले बनताय चिडखोर; मोबाईल, टीव्हीचा परिणाम
जळगाव जिल्ह्यात सात टक्के पाणीसाठा कमी

इंटरनेट झाले परवडेनासे

ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईलवर दर महिन्याचा नेटपॅक रिचार्ज करण्याचे पालकांकडील काम व खर्च आधीच वाढला आहे. त्यात लॅपटॉप, कॉम्प्युटर असले, की खर्च अधिकच होतो. टीव्हीच्या रिचार्जचाही खर्च होत असल्याने हे तिहेरी शुल्क पालकांना परवडत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत.

इंटरनेटसह स्क्रीनसमोर तासन्‌तास बसण्याचे दुष्परिणाम तत्काळ दिसत नाहीत, पण कालांतराने ते तीव्र स्वरूपात समोर येतात. अशावेळी नेट, टीव्ही वापराचे नियम करून दिले पाहिजेत. मुलांच्या समस्यांबाबत मानसोपचारतज्ज्ञांशी पालकांनी चर्चा करावी. शिक्षकांनीही त्याबाबत जागरूक राहावे.

- चंद्रकांत भंडारी, शिक्षणतज्ज्ञ

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com