पोळ्यानिमित्‍त नाथाभाऊंची बैलजोडी पुजा; सहकुटुंब सण साजरा

पोळ्यानिमित्‍त नाथाभाऊंची बैलजोडी पुजा; सहकुटुंब सण साजरा
पोळ्यानिमित्‍त नाथाभाऊंची बैलजोडी पुजा; सहकुटुंब सण साजरा

जळगाव : शेतकर्‍यांचा सोबती असलेल्या बैल पोळ्यानिमित्त कोथळी येथे आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बैलजोडीची पुजा करून, त्यांना नैवद्य खावू घालत बैलपोळा साजरा केला. पारंपारिक पद्धतीने यंदा देखील सहकुटुंब बैलपोळा सण साजरा केला. (jalgaon-news-eknath-khadse-and-family-pola-celebration-kothli-village)

कोथळी (ता. मुक्‍ताईनगर) येथे बैलाची विधिवत पूजा करत एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते बैलाची पूजा करून नेहमीप्रमाणे पोळा सण साजरा केला. पोळा सणानिमित्त विविध ठिकाणी बैलांची मिरवणूक काढून पेाळा फोडण्याची पद्धत आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे यंदा पोळ्यानिमित्‍त मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारली आहे. बैलांची मिरवणूक काढल्यास कारवाई करण्यात येईल असे आदेश आहेत.

शेतकरी बांधवांनी घरीच बैलांची पूजा करून हा सण साजरा करावा. सार्वजनिक प्रसादाचे वाटप करू नये. कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. असे आदेश असल्याने यावर्षी पोळा सण हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्‍यानुसार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर कोथळी येथील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पारंपारिक पद्धतीने यंदा देखील सहकुटुंब बैलपोळा साजरा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com