आपण फक्त युती तुटल्याची घोषणा केली, म्‍हणूनच फडणवीस मुख्‍यमंत्री झाले; खडसेंचे प्रत्‍यूत्‍तर

आपण फक्त युती तुटल्याची घोषणा केली, म्‍हणूनच फडणवीस मुख्‍यमंत्री झाले; खडसेंचे प्रत्‍यूत्‍तर
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

जळगाव : भाजप पक्षाने सामुहिकरित्या निर्णय घेतला होता. आपण फक्त युती तुटल्याची घोषणा केली होती. ही युती तुटली म्हणूनच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्या कालखंडात मुख्यमंत्री होऊ शकले आहे; अन्यथा युती असती तर फडणीस मुख्यमंत्री होऊ शकले नसते, असा दावा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. (Jalgaon News Eknath Khadse)

Eknath Khadse
TET Exam Scam: धुळे जिल्ह्यात ५१ शिक्षक बोगस

एकनाथ खडसे यांनी सेना आणि भाजपची (BJP) युती तोडली; त्या एकनाथ खडसे यांच्या मांडीला मांडी लावून बसता. त्यावेळी तुम्हाला त्याचे काही वाटत नाही आणि आम्हाला गद्दार म्हणतात. अशा प्रकारची टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली होती. यावर प्रत्‍युत्‍तर देताना खडसे बोलत होते.

तो भाजपचा सामुहिक निर्णय होता

याविषयी बोलताना खडसे यांनी म्हटले आहे, की आपण युती तोडली नाही. तर तो निर्णय भाजपकडून सामूहिकरित्या अगोदरच घेण्यात आला होता. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे नेते त्यात होते. त्याला केंद्रातील नेत्यांची अनुमती होती. मात्र या निर्णयाची घोषणा कोणी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. एकमेकांकडे हा निर्णय घेण्याची घोषणा करण्याबाबत सांगितले जात होते. मात्र युती तुटल्याचा निर्णय जाहीर करण्याची जबाबदारी विरोधी पक्ष नेता म्हणून पक्षाने आपल्यावर दिली असल्‍याचे खडसे यांनी स्‍पष्‍ट केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com