विरोधक घाबरलेत, म्‍हणून तेही फिरू लागले; मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निशाणा

विरोधक घाबरलेत; मी फिरलो म्‍हणून तेही फिरू लागले; मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निशाणा
Eknath Shinde Jalgaon News
Eknath Shinde Jalgaon NewsSaam tv

जळगाव : रात्रंदिवस काम करायला तयार आहे. अडीच वर्षात जेवढी कामे झाली नाही; तेवढी कामे गेल्‍या अडीच महिन्‍यात केली आहेत. अजून दोन वर्ष बाकी आहेत. यामुळे विरोधक आता घाबरले आहेत. मी फिरत असल्‍यामुळे तेही फिरू लागले आहेत; असा निशाणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षांवर साधला आहे. (Jalgaon Elnath Shinde News)

Eknath Shinde Jalgaon News
Jalgaon: मुख्यमंत्र्यांसमोर पन्नास खोके एकदम ओके आंदोलनाचा प्रयत्न; पोलिसांकडून राष्ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांना अटक

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव (Jalgaon) जिल्‍हा दौऱ्यावर असून पाळधी (ता. धरणगाव) येथे आयोजित सभेदरम्‍यान ते बोलत होते. मुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले, की बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) पुढे जात आहे. राज्‍यातच नाही तर राज्‍याच्‍या बाहेरची शिवसेना देखील आम्‍हाला जॉईन झाली आहे. बाळासाहेबांच्‍या विचारांची शिवसेना पुढे न्‍यायचीय म्‍हणून धाडसाने हे पाऊल उचलले आहे.

युती जनतेने स्‍वीकारली

बाळासाहेब व नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे फोटो लावून निवडणूक लढलो. अनेक लोकांनी सांगितले, की आमच्‍या मतांचा अनादर केला आहे. धोका दिला, गद्दारी केली. पण गद्दार कोण? असा अप्रत्‍यक्ष सवाल देखील मुख्‍यमंत्री शिंदे यांनी केला. (BJP) भाजप– शिवसेना युतीला जनतेने स्‍वीकारले आहे. ते अडीच महिन्‍यात दिसतेय. आरोप होत आहेत, परंतु आम्‍ही कामातून उत्‍तर देवू. मतदारांशी खेळखंडोबा करत नाही. त्‍यांना न्‍याय देवून मत मागणार असल्‍याचे म्‍हणाले.

राष्‍ट्रवादी शिवसेनेला संपवत होती

राष्‍ट्रवादी शिवसेनेला गिळायला निघाला होता. हे अडीच वर्ष असेच राहिले असते तर बोटावर मोजण्याइतकेच शिवसैनिक शिल्‍लक राहिले असते. झोपलेल्‍या माणसाला जागे करता येत असते. परंतु सोंग केलेल्‍या व्‍यक्‍तीला कसे जागे करणार. झालेली चूक दुरूस्‍त करा हे सांगत राहिलो. परंतु, उपयोग झाला नाही.

गुलाबरावांचे भाषण बंद केले

एसटीचे प्रश्‍न देखील सोडविणार त्‍यांच्‍यावर अन्‍याय झाला आहे. जळगावमध्‍ये जे प्रश्‍न आहेत ते सोडविणार आहे. गुलाबरावांचा मी चाहता आहे. त्‍यांचे भाषण ऐकण्यास उत्‍सुक आहे. परंतु, क्रेडीट मिळेल म्‍हणून शिवाजी पार्कवरील त्‍यांचे भाषण बंद केले होते. चांगले बोलतात हा त्‍यांचा गुन्‍हा आहे का? परंतु, शिंदे तसा व्‍यक्‍ती नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com