Fraud: लीफ्टच्या नावे डॉक्टरला गंडवले

याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिसांत (Police) संशयीताच्या विरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.
fraud
fraudsaam tv

जळगाव : शहरातील विवेकानंदनगर परिसरातील डॉक्टरच्या नवीन बांधकाम सुरु असलेल्या तीन मजली इमारतीत लिफ्ट बवण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, संबधीतांनी ३ लाख ३६ हजार रुपये अगाऊ घेवुनही लिफ्ट बसवुन दिली नाही. याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिसांत (Police) संशयीताच्या विरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news elevators ruined the doctor three and half fraud)

fraud
कर्नाटकचे पडसाद धुळ्यात; बजरंग दलातर्फे धडक मोर्चा

जळगाव (jalgaon) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोरील साईमंदिर परिसरात डॉ. तुषार चंद्रकात नेहते (वय ४४) यांचे नवीन बांधकाम झालेले हॉस्पीटल असून त्यांनी हॉस्पीटलसाठी लिफ्टची सोय म्हणुन विकेश पाटील, ऋषीकेश पाटील अशा देाघांना काम दिले हेाते. काम करण्यापुर्वीच देाघांनी (Doctor) डॉक्टरांकडून ३ लाख ३६ हजार रुपये रेाख घेवुन काम सुरु करतो असे सांगितले.

न वटणारे चेक दिले

टाळाटाळ करत कामही करत नाही पैसेही देत नाही म्हणुन डॉक्टरांनी तगादा लावल्यावर देाघांनी त्यांना न वटणारे चेक देऊन फसवणुक केली. याप्रकरणी डॉक्टरांनी जिल्‍हापेठ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन संशयीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com