बोलण्यात गुंतवुन ठेवत अकरा मोबाईल लांबविले; चोरटे पितापुत्र अटकेत

बोलण्यात गुंतवुन ठेवत अकरा मोबाईल लांबविले; चोरटे पितापुत्र अटकेत
बोलण्यात गुंतवुन ठेवत अकरा मोबाईल लांबविले; चोरटे पितापुत्र अटकेत
Mobile TheftSaam tv

जळगाव : गोलाणी मार्केटमधील दुकानात मोबाईल खरेदी करण्याच्या बहाणा करून तब्बल १ लाख ६५ हजार १७० रूपये किंमतीचे महागडे ११ मोबाईल चोरणाऱ्या पिता-पुत्राला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक (Nashik) येथून अटक केली आहे. अनेक दुकानदारांना गंडा घालणाऱ्या या भामट्यांमध्ये मुलगा दुकानदारांना बोलण्यात गुंतवुन ठेवत असे, तोपर्यंत बाप मोबाईलवर हात साफ करत असल्याचे त्यांनी कबुली दिली आहे. (jalgaon news Eleven mobiles theft engaging in conversation)

Mobile Theft
वरणगावात ‘सीआयडी’चा छापा; बढे पतसंस्थेच्या सात संचालकांना अटक

जळगाव (Jalgaon) शहरातील गोलाणी मार्केटमधील गुरूकृपा मोबाईल केअर या दुकानावर संशयित आरोपी कैलास लालवाणी आणि सुमित लालवाणी असे दोघ पिता-पुत्र मंगळवार (१४ जून) रोजी दुपारी आले. मोबाईल घेण्याचा बहाणा करून त्यांनी तब्बल १ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे महागडे ११ मोबाईल दुकानदाराला बेालण्यात गुंतवुन (Theft) चेारुन नेले. याबाबत बुधवारी शहर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पेालिसात तक्रार येताच गुन्हेशाखेला वर्दी मिळाली. संशयीत पितापुत्राचा माग घेतांना चोरीचे मोबाईल घेवून भामटे पिता-पुत्र मुंबईच्या (Mumbai) रेल्वेतून दिशेने गेल्याची खात्री झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार रवि नरवाडे, युनूस शेख, संजय हिवरकर,सुनिल दामोदरे, संदिप पाटील, प्रविण मांडोळे आदींचे पथक त्यांच्या मागावर लागले.

नाशिक रेल्‍वे स्‍टेशनवरून ताब्‍यात

पथक मागावर असताना निरीक्षक बकाले यांनी लोहमार्ग पोलीस स्टेशन नाशिक व रेल्वे सुरक्षा बल नाशिक यांच्याशी संपर्क साधून दोघा पिता पुत्रांचे छायाचित्र पाठवून त्यांना अडवण्याची विनंती केली. देाघांना नाशिक रेल्वेस्थानकावर अटकाव होताच गुन्हेशाखेचे पथक मागील गाडीने नाशिक धडकले. देाघा पिता पुत्राला नाशिक रेल्वेस्थानकातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. ताब्यातील दोघांची अधिक चौकशी केली असता कैलास श्रीबलराम लालवाणी (वय ४८) आणि सुमित कैलास लालवाणी (वय २३ दोन्ही रा. बडोदरा गुजरात) या पिता पुत्रावर मध्य प्रदेशातील इंदौर, राजस्थानातील जोथपुर यासह अकोला, मुंबई, पुणे, कोटा अशा विविध शहरांमध्ये लाखो रुपयांचे ब्रॅण्ड न्यु मोबाईल चोरुन नेल्याचे गुन्हे दाखल आहेत. मात्र गुन्हेशाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालत पाहुणचार केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी दोघांना शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com