Accident: भीषण अपघातात अकरा महिन्यांचा बालक ठार; आठ प्रवासी जखमी

भीषण अपघातात अकरा महिन्यांचा बालक ठार; आठ प्रवासी जखमी
Accident
AccidentSaam tv

पाचोरा (जळगाव) : नंदीचे खेडगाव (ता. पाचोरा) गावाजवळ जळगाव ते पाचोरा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास भरधाव मालवाहू पिकअपने धडक (Accident) दिल्याने प्रवासी वाहतूक करणारी गाडी रस्त्याच्या खाली उतरून उलटली. त्यात अकरा महिन्यांचा बालक गाडी खाली येऊन जागीच ठार, तर गाडीतील नऊ जण जखमी झाले. पाचोरा (Pachora) पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेतले आहे. (Jalgaon Pachora Accident News)

Accident
Jalgaon: वीजबिल वसुलीतूनच होणार यंत्रणा सक्षम!

प्रवासी वाहतूक करणारी गाडी (एमएच १५, एएक्स १८३२) प्रवासी घेऊन पाचोऱ्याकडे येत असताना शिरसोली येथे दापोरा येथील रहिवासी भगवान सोनवणे यांनी आपली पत्नी अनिता व अकरा महिन्यांचा मुलगा गणेश यांना रक्षाबंधनासाठी (Raksha Bandhan) भडगाव येथे जाण्यासाठी गाडीत बसवले. दुपारी दोनच्या सुमारास खेडगाव नंदीचे येथून प्रवासी वाहतूक करणारे हे वाहन पाचोऱ्याकडे येत असताना पाचोऱ्याकडून भरधाव येणाऱ्या मालवाहू पीकअपने (एमएच १९, सीवाय ९२२३) जोरदार धडक दिली. त्यामुळे प्रवासी गाडी रस्त्याखाली उतरून उलटली. त्यात अकरा महिन्यांचा गणेश जागीच ठार झाला.

अपघातातील जखमी

या अपघातात वाहनचालक भय्या कोळी (रा.नंदीचे खेडगाव), अनिता चव्हाण (वय ३८, रा. कोकडी तांडा), सुशीला राठोड (वय ३८), विकास पवार (वय २७), लता राठोड (वय ३७), निकिता राठोड (वय १८, तिघेही रा. रामदेव वाडी), अनिता सोनवणे (वय २२, दापोरा), ऋषिकेश पंडित (वय १६, रा. लासगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार समीर पाटील, संदीप भोई, योगेश पाटील घटनास्थळ येत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. जखमींना रुग्णालयात भरती करण्यासाठी रवाना करीत पिकअप चालकास ताब्यात घेतले. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com