एरंडोलमध्‍ये शिवसेनेतर्फे रास्‍तारोको; महागाई व भाजप आमदारांच्‍या कृतीचा निषेध

एरंडोलमध्‍ये शिवसेनेतर्फे रास्‍तारोको; महागाई व भाजप आमदारांच्‍या कृतीचा निषेध
एरंडोलमध्‍ये शिवसेनेतर्फे रास्‍तारोको; महागाई व भाजप आमदारांच्‍या कृतीचा निषेध
Shiv sena

जळगाव : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या आमदारांच्या कृतीचा निषेध नोंदवण्यासाठी एरंडोल येथे शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. (jalgaon-news-erandol-shiv-sena-road-block-aandolan)

Shiv sena
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे धुळ्यात राज्य सरकारचा निषेध

एरंडोल पंचायत समितीच्या कार्यालयापासून महामार्गापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शिवसैनिकांनी महार्गावर ठिय्या मांडत भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपची भूमिका मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे. हेच भाजप आमदारांच्या विधानसभेतील भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे, असा आरोप यावेळी बोलताना डॉ. हर्षल माने यांनी केला.

वाढत्‍या महामार्गविरोधातही आवाज

वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे आवाक्याबाहेर गेलेले दर या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी करण्यात आली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महानंदा पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com