
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसराशेजारील सुप्रिम कॉलनी भागात एका विवाह (Marriage) समारंभात आईसोबत आलेली सहा वर्षीय चिमुरडी मंडपात खेळत होती. या दरम्यान पंचवीस वर्षीय तरूणाने तिला गोडबोलत शेजारील एका खोलीत नेत (Jalgaon) अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (Live Marathi News)
प्रत्यक्षदर्शी आणि (Police) पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नातील गर्दीत आई व्यस्त असताना नराधमाने बालिकेला आमिष देत बाजूला नेले. शेजारील घराच्या एका खोलीत नेत तो पिडीतेवर अत्याचार करत असतानाच पिडिता किंचाळली. नेमके त्याच वेळेस मुलगी दिसत नाही. म्हणून तिची आई शोध घेत असताना त्या खोलीजवळ आली. तिने दार ठोठावत आरडाओरड केल्यावर पिडीतेला (Crime News) सोडून भामटा पसार झाला. यानंतर घटनास्थळावर गर्दी झाली, एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली.
मुलीच्या पालकांवर दबाव आणायचा प्रकार
सहा वर्षीय बालिकेसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती कळताच पिडीतेचे नातेवाईक कुटुंबीयांसह परिसरातील रहिवासी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकत्र आले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यापूर्वीच कथित समाजसेवकांनी या प्रकरणात मध्यस्थीचाही प्रयत्न केला. आपल्यात वाद नको म्हणत पिडीतेच्या पालकांवर दबाव आणला जात असताना यापूर्वी असाच प्रकार घडलेल्या दुसऱ्या एका पिडीतेचे पालकही पोलिस ठाण्यात धडकले. आमच्याही मुलीसोबत अर्शद नावाच्या भामट्याने गैरप्रकार केल्याची त्यांनी माहिती दिली.
पळून जाण्याच्या प्रयत्नात
पिडीतेच्या आईने पोलिसांना घटना सांगितली. अर्शद ऊर्फ अरबाज पटेल ऊर्फ बच्चन (२५, रा. सुप्रिम कॉलनी) या संशयितांची माहिती देताच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक अल्ताफ पठाण, सुधीर साळवे, राहुल रगडे, इम्रान सय्यद, सुधीर साळवे यांनी संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने ओळखले. तो पळून गेलेल्या मार्गाने त्याचा शोध घेत असताना जळगाव औरंगाबाद रस्त्यावर वाहनाला थांबवून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अर्शदने यापूर्वीही दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.