बैल खरेदीस आलेल्या शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

बैल खरेदीस आलेल्या शेतकऱ्याची दुचाकी लांबविली
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

चाळीसगाव (जळगाव) : कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल खरेदी करण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याची दुचाकी अज्ञाताने लांबविल्याची घटना १४ मे रोजी घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस (Police) स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news farmer bike theft on chalisgaon bajar sameeti)

Jalgaon News
भुसावळ– इगतपुरी मेमू नाशिकपर्यंतच धावणार

शिरूड (ता. मालेगाव जि. नाशिक) येथील विजय रामराव महाले (वय ४२) हे बैलजोडी खरेदी करण्यासाठी चाळीसगाव (Chalisgaon) कृषी उत्पन्न बाजार समिती येथे १४ मे रोजी आले होते. तत्पूर्वी त्यांनी आपली युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल (क्र.एम.एच. ४१ एजे ६३८८) बाजार समितीच्या गेटजवळ लावली. त्यानंतर बैल जोडी खरेदीसाठी ते बाजारात गेले. काहीवेळाने महाले हे मुळ जागी परतले. तेव्हा त्यांना उभी केलेली मोटारसायकल दिसून आली नाही.

शोधाशोधनंतर पोलिसात तक्रार

महालेंनी परिसरासह घाट रोड, बस स्थानक, भडगाव रोड, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी शोधाशोध केली. परंतु ३५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल आजपावेतो मिळून आली नाही. यावर विजय रामराव महाले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोना महेंद्र पाटील हे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com