शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात

शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात
शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात
पिके

चोपडा (जळगाव) : पावसाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांच्या दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, पेरणी केल्यानंतर पाऊस न आल्याने लहान कोंब नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून, पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता कमी असल्याने पेरणी केलेली पीक वाया जाण्याची शक्यता आहे. (jalgaon-news-farmer-waiting-but-no-rain-Crops-on-hundreds-of-hectares-in-danger-zone)

चोपडा तालुक्यातील ६४ हजार ४९० हेक्टर एकूण क्षेत्रापैकी ४९ हजार ९६५ हेक्टरवर म्हणजे ७७.४७ टक्के पेरणी झाली आहे. बागायती क्षेत्रात संकरित बीटी कापूस, मिरची, केळी, ऊस लागवड झाली आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी मका, ज्वारी, तूर, कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांची पेरणी केली. परंतु त्यावर पाऊस पडला नाही. यामुळे दुबार पेरणीचे संकट बळीराजावर येऊन ठेपले आहे. यंदा पावसाचे अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन मका, तूर, मूग, उडीद, तीळ आदी वाणांचे बियाणे महागाईने घेतले आणि पेरले आहे. दरम्यान, ३० जून ते ४ जुलै दरम्यान कडक ऊन पडल्याने पिकांचे कोंब जळून जात आहेत. पावसाचे चिन्हे दिसत नसल्याने आभाळाकडे आशाळभूत नजरेने बळीराजा पाहत आहे.

पिके
पावसाची ओढ; पीक वाचवण्यासाठी शेतकरी देताहेत चुवा

अशी झाली आहे पेरणी

तालुक्यात खरीप हंगामात पिकनिहाय झालेली पेरणी हेक्टरमध्ये : बाजरी- ५३१ हेक्टर, ज्वारी- १ हजार ७०९, मूग -३ हजार ७८०, सोयाबीन -७५४, मका- ७ हजार ८५६, तूर -३८४, कापूस -२१ हजार ८६५ बागायती, तर जिरायती -१० हजार ६०५, उडीद- ९७५ अशी एकूण ४९ हजार ९६५ हेक्टर वर पेरणी झाली आहे.

घामाच्या धारा,पाऊस नाहीच

तालुक्यात एक दिवस वगळता २३ जूनपासून म्हणजे जवळपास १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आतापर्यंत तालुक्यातील सात मंडळात ६२.०९ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, २८ चोपडा - ३८ मि.मी, अडावद-१३ मि. मी., धानोरा - ११ मि.मी., गोरगावले-८९ मि.मी., चहार्डी-४ मि.मी

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com