शेतकरी महिलेची विहिरीत उडी; सात लाखाच्‍या कर्जापोटी आत्‍महत्‍या

शेतकरी महिलेची विहिरीत उडी; सात लाखाच्‍या कर्जापोटी आत्‍महत्‍या
शेतकरी महिलेची विहिरीत उडी; सात लाखाच्‍या कर्जापोटी आत्‍महत्‍या
Farmer suicide

अमळनेर (जळगाव) : मेहेरगाव (ता.अमळनेर) येथील एका कर्जबाजारी महिला शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सदर घटना रविवारी (२१ नोव्‍हेंबर) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. (jalgaon-news-Farmer-woman-jumps-well-committed-suicide-by-borrowing-sevan-lakh-loan)

Farmer suicide
खासदार सुभाष भामरेंना धक्‍का; तीनही माजी आमदारांनी राखला गड

मेहेरगाव येथील कोकीळाबाई संजय पाटील (वय ४७) या महिलेने पिळोदा येथील सुधाकर दत्तात्रय साळुंखे यांच्या मेहेरगाव शिवरातील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. कोकिळाबाई यांच्याकडे सात एकर शेती होती. त्यांच्यावर सोसायटीचे दोन लाख पीक कर्ज तर खाजगी सावकाराचे चार ते पाच लाख रुपये कर्ज होते.

गतवर्षी शेतही विकली

कर्जापोटी कोकीळाबाईने आत्महत्या केल्याचे सरपंच राकेश ठाकरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी कर्जापोटी शेती विकली गेली होती. सदर महिलेचे दिर सुरेश देविदास पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोकीळाबाई यांच्या पश्चात पती व दोन अविवाहित मुले असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com