पिक विमा भरण्यास शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; भरपाई न मिळाल्याने उदासिनता
Crop insurance

पिक विमा भरण्यास शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; भरपाई न मिळाल्याने उदासिनता

या वर्षी पावसाचे अनियमितपणा, पावसाचे प्रमाण कमी, पिके उगवन होवून पावसा अभावी पिकाची वाढ कुंटत चालल्याने व उन्हाने पिके सुकत असल्यामुळे दुबार तिबार पेरणीचे संकट आहे. यामुळे शेतकरींना पिक विमा गरजेचा आहे. तरी देखील शेतकरी पिक विम्‍याचा लाभ घेण्यास शेतकरी तयार नाही.

तोंडापूर (जळगाव) : तोंडापूरसह परिसरात शेतकऱ्यांनी या वर्षी पिक विमा भरण्यासारखी परिस्थिती असूनही मागील वर्षीची भरपाई न मिळाल्याने पिक विमा भरण्यास ना पसंती दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यास पाठ फिरवण्यात आली असल्याचे चित्र दिसून येत आहे. (jalgaon-news-Farmers-this-year-turn-to-pay-crop-insurance)

तोंडापूरसह परिसराला लागून कुंभारी बु., भारुडखेडा, मांडवे, गोराडखेडा, खांडवे, ढालसिंगी, ढालगाव या गावाचा समावेश असून येथील शेतकरी तोंडापूर सोसायटी व आपले सेवा सरकार केंद्रात पिक विमाचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र या वर्षी पावसाचे अनियमितपणा, पावसाचे प्रमाण कमी, पिके उगवन होवून पावसा अभावी पिकाची वाढ कुंटत चालल्याने व उन्हाने पिके सुकत असल्यामुळे दुबार तिबार पेरणीचे संकट आहे. यामुळे शेतकरींना पिक विमा गरजेचा आहे. तरी देखील शेतकरी पिक विम्‍याचा लाभ घेण्यास शेतकरी तयार नाही.

गतवर्षीची नुकसान भरपाईच नाही

मागील वर्षी विमा भरून देखील विमा कंपनीकडून नुकसान भरपाई आजपर्यंत मिळाली नाही. यंदाच्‍या वर्षात विम्‍याचे अर्ज भरण्यासाठी शेतकरी तयार नसल्याने कमी प्रमाणात शेतकरी विमा भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षीपेक्षा यावेळी मात्र २५ टक्‍के शेतकरी पिक विम्याचे अर्ज करत आहे. पिक विमा भरूनही नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे पिक विमा भरण्यासाठी शेतकरी धजावत नाही.

Crop insurance
पावसाचे कमबॅक..तीन आठवड्यानंतर जळगावात हजेरी

जाचक अटींचाही त्रास

विमा कंपनीच्या मनमानी व जाचक अटींचा शेतकऱ्यांना त्रास होत असल्याने या वर्षी पिक विम्याकडे पाठ फिरवण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात ऑनलाईनच्या मोठ्या समस्या जाणवत आहे. इंटरनेट सेवा वेळोवेळी बंद पडत असल्याने फार्म भरण्यासाठी अडचणी येत आहे. दरवर्षी विमा भरणाऱ्या ना न्याय मिळावा; अशी आपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com