दुर्देवी..वीज पडून पिता-पुत्राचा मृत्‍यू; दोन महिला थोडक्यात बचावल्या

दुर्देवी..वीज पडून पिता-पुत्राचा मृत्‍यू; दोन महिला थोडक्यात बचावल्या
Jalgaon News lightning
Jalgaon News lightningSaam tv

तरवाडे (जळगाव) : संपुर्ण कुटूंब शेतात काम करत होते. या दरम्‍यान विजांचा कडकडाट सुरू झाला. तरी देखील कुटूंब कामात व्‍यस्‍त राहिले. दुर्देवाने झाडाखाली काम करत असताना अचानक वीज कडाडली अन्‌ काम करणाऱ्या पिता- पुत्राच्या अंगावर वीज कोसळल्याने त्‍यांचा मृत्यू झाला. सोबत असलेल्‍या दोन महिला यातून बचावल्‍या असून डोळ्यादेखत पती व मुलाचा मृत्‍यू महिलेला पहावा लागला. (Jalgaon News died due to lightning)

Jalgaon News lightning
बुलढाणा जिल्ह्यात लम्पि स्किनचा धोका वाढला; तीन जनावरे मृत्युमुखी

न्हावे येथील शेतकरी आबा शिवाजी चव्हाण (वय ४५) व त्‍यांचा मुलगा दीपक ऊर्फ विक्की आबा चव्हाण (वय १६) हे कुटुंबासह कपाशीच्या शेतातील लागवड केलेले आंतरपीक उडदाच्या शेंगा तोडत होते. कुटुंबातील चव्हाण यांची पत्नी व त्यांची मेहुणीही या कामी त्यांना मदत करीत होते. परंतु ते दोघे जण शेतात काही अंतरावर होते. या वेळी विजांचा कडकडाट सुरू झाला. कामाची लगबग सुरू असताना शेवग्याच्या झाडाखाली पिता-पुत्र आपल्या कामात व्यस्त असताना वीज कडाडली व कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यांसमोर आबा चव्हाण व दीपक (विक्की) यांच्या अंगावर वीज कोसळताच दोघांचा जागीच मृत्यू झाला.

गावात एकही चूल पेटली नाही

या दुर्दैवी घटनेत पिता– पुत्राचा मृत्‍यू झाल्‍याने अख्‍खे गाव शोकसागरात बुडाले होते. यामुळे न्हावे गावात एकही चूल पेटली नाही. कष्टाळू कुटुंबावर मोठा आघात झाल्याने अन् घरातील कर्ताच गेल्याने दुःखाचा डोंगरच कोसळला.

आमदारांची घटनास्थळी धाव

आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबासह शोककळा पसरलेल्या ग्रामस्थांचे सांत्वन केले. शासनाकडून तातडीने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. एकाच कुटुंबातील कर्ता पुरुष व अल्पवयीन मुलगा डोळ्यांदेखत गेल्याने मातेवर अक्षरश: डोंगर कोसळला. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com