मुलाच्‍या मृत्‍यूचे दुःख..पार्थिव नेण्यासाठी पित्याला मागावी लागली भिक्षा

मुलाच्‍या मृत्‍यूचे दुःख..पार्थिव नेण्यासाठी पित्याला मागावी लागली भिक्षा

मुलाच्‍या मृत्‍यूचे दुःख...पार्थिव नेण्यासाठी पित्याला मागावी लागली भिक्षा

जळगाव : तरुण मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. वृद्ध पित्‍याला आपल्‍या डोक्‍याबरोबरच्‍या मुलाच्‍या मृत्‍यूचे दुःख पेलवत नव्‍हते. डोळ्यात अश्रूंच्‍या धारा पण मृत मुलाचे पार्थिव घरी नेण्यासाठी तो पिताही हतबल झाला होता. खिशात दमडीही नसल्याने वृद्ध पित्‍याला भिक्षा मागावी लागली. मात्र या वृद्धाच्‍या आर्त हाकेला कोणाचाही पुकारा नव्‍हता. शेवटी पत्रकारांच्या विनंतीवर जननायक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विनामूल्य पार्थिव नेण्याची सोय केली.

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील जयराम ज्योतीराम मांग (वय २७) या तरुणाला रविवारी (ता. ५) घराजवळच मण्यार जातीच्या सर्पाने दंश केला. ग्रामीण रुग्णालयात प्रकृती खालावल्याने लगेच जळगावी हलविण्यात आले. जिल्‍हा सामान्य रुग्णालयात जयरामवर उपचारासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्त केली. मात्र, सोमवारी सकाळी जयराम शांत झाला.

पित्‍याचे अवसान गळाले तरीही..

अंगावरच्या कपड्यांनी मुलाला उपचाराला दाखल केलेला बाप नऊ दिवस तसाच फाटक्या कपड्यात सेवा करत होता. सोमवारी तरुण मुलगा गेल्याने त्याचे अवसान गळाले. ‘मुलाला घरी पोचवून द्या..’ असे आर्जव तो, शासकीय रुग्णवाहिकाचालकांना करू लागला. मात्र त्यांनी नकार दिला.

भिक्षा मागावी लागली

जिल्‍हा रुग्णालयात जवळपास सर्वच पुढाऱ्यांचे आरोग्यदूत फिरत असतात. आज मात्र ते दिसले नाहीत. हजर असलेल्यांना पार्थिव नेण्यासाठी किमान इंधन खर्च अपेक्षित हेाता. परिणामी परिस्थिती कळूनही त्यांनी कानाडोळा करत टाळले. अखेर इंधनखर्चासाठी हा पिता जिल्‍हा रुग्णालयाच्या आवारातच भिक्षा मागू लागल्याचे मन विषण्ण करणारे चित्र दिसून आले.

मुलाच्‍या मृत्‍यूचे दुःख..पार्थिव नेण्यासाठी पित्याला मागावी लागली भिक्षा
नागपूर महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; भाजप नेत्यांनीच केला आरोप

‘जननायक’चा मदतीचा हात

वृत्तांकन करताना पत्रकारांना हा प्रकार दिसला. त्यांनी ‘जननायक’ फाउंडेशनच्या फिरोज पिंजारी यांना बोलावून घेतले. समोरची व्यक्ती इंधनखर्चही देऊ शकत नसल्याची स्थिती सांगत विनंती केल्यावर फिरोज पिंजारी, फरीद खान आणि चालक हारून पिंजारी यांनी विनाखर्च पार्थिव घरापर्यंत पोचविण्याची तयारी दर्शविली.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com