एक हजार पुरुषांमागे ९१९ महिला मतदार; नावनोंदणीतही मागे

एक हजार पुरुषांमागे ९१९ महिला मतदार; नावनोंदणीतही मागे
Women voter
Women voter

जळगाव : निवडणुकीत मतदान करण्यास सर्वच उत्सुक असतात. महिला मतदान करण्यास अग्रभागी असतात. मात्र त्यांचे मतदार नोंदणीची प्रमाण एक हजार पुरुष मतदारांमागे ९१९ महिला मतदार इतके आहे. हजार पुरुषांमागे ८१ महिला मतदार नोंदणीच करीत नाही. महिलांनी मतदार नोंदणीत सहभागी होऊन मतदान केले, तर महिलांचा मतदानातील टक्का वाढेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. (jalgaon-news-female-voters-for-every-one-thousand-men-Back-in-enrollment-too)

कोणत्याही निवडणुकीत महिलांचा कोटा राखीव असतो. मात्र मतदानावेळी त्या मागे असतात, असेच आकडेवारीतून दिसत आहे. सर्वच वयोगटांतील महिलांनी आपले नाव मतदारयादीत आहे किंवा नाही याची खात्री करून मतदार नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले आहे.

सहा हजार नवमतदारांनी काढले ई- ईपीक कार्ड

निवडणूक विभागाने मतदार ओळखपत्र ई-ईपीक कार्ड ऑनलाइन काढण्याची सुविधा केवळ १८ वर्षांनंतर पहिल्यांदा नावनोंदणी करणाऱ्यासाठी दिली आहे (नवमतदार). २०२१ मध्ये आतापर्यंत नऊ हजार ९४१ नवमतदारांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी सहा हजार ८९३ नवमतदारांनी ई-ईपीक मतदार कार्ड डाउनलोड केले. तीन हजार ४८ मतदार ई-ईपीक कार्ड डाउनलोड करावयाचे बाकी आहेत.

Women voter
जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखाची रक्‍कम हस्‍तगत

आकडे बोलतात...

जिल्ह्यातील मतदाराची संख्या अशी

पुरुष मतदार - १७ लाख ८२ हजार ३६७

महिला मतदार - १६ लाख ३९ हजार ३२३

एकूण मतदार - ३४ लाख २१ हजार ७७६

तृतीयपंथी मतदार - ८६

१८ ते १९ वयोगटांतील मतदार - ६७ हजार ५६६

२०-२९ गटांतील - सहा लाख ९७ हजार ६५५

५०-६० वयोगटांतील - पाच लाख १८ हजार ४१७

८०-९० वयोगटांतील - ८१ हजार २२२

९० ते शंभर वयोगटांतील - १३ हजार ८६४

शंभर वयापेक्षा अधिक वय असलेले - १३२

मतदारांचे गुणोत्तर - १०००ः ९१९

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com