चक्‍क दारु दुकान परवानगीसाठी ग्रामसभेत पाच अर्ज

चक्‍क दारु दुकान परवानगीसाठी ग्रामसभेत पाच अर्ज
gram sabha
gram sabha

तोंडापूर (जळगाव) : गावात दारूचे दुकान नको म्‍हणून ग्रामस्‍थ प्रामुख्‍याने महिला वर्गाचा पुढाकार असतो. यासाठी ग्रामसभेत ठराव करून दारूचे दुकान बंद केले जाते. मात्र देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामसभेत अर्ज दाखल करत परवानगी मागण्यात आली. हा प्रकार जळगाव जिल्‍ह्यातील तोंडापूर ग्रामपंचायतीत झाला. (jalgaon-news-Five-applications-in-tondapur-gram-panchayat-Gram-Sabha-for-liquor-shop-permission)

gram sabha
२५ लाखांची लागली लॉटरीचे नाव अन्‌ महिलेची ऑनलाइन फसवणूक

तोंडापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच नसिबा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. शाळेतील शिक्षकांनी मतदार याद्यांचे वाचन केले. मतदार याद्या नाव समाविष्ट, दुरुस्त्या, वाढीव मतदार या महत्त्वाच्या विषयांवर घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी ग्रामसभेकडे पाठ फिरविण्यात आली. गावकऱ्यांचा अल्पसा प्रतिसाद दिसून आला. या वेळी तलाठी शिवाजी काळे, ग्रामविकास अधिकारी अनंत वंजारी, कृषी सहाय्यक कराळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन साबळे, सैललाल सय्यद बशीर, शिवाजी अपार, धनराज कानडजे, सुनील कालभिले, बाजीराव रावते, जितेंद्र पाटील, अक्षय पारख, गोकुळ वाघ, बशीर खान यांच्यासह गावकरी उपस्थित होते. आजची ग्रामसभा देशी दारुच्या दुकानास परवानगी द्या, या विषयावर गाजली.

माजी सरपंचाकडून अर्ज

मतदार याद्यांचे वाचन करून झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्यावतीने देशी दारुच्या दुकानास परवानगीचा अर्ज माजी सरपंच नाना पाटील यांनी दिला असता त्याला सुनील बावस्कर व ग्रामपंचायत सदस्य गजानन साबळे यांच्याकडून विरोध करण्यात आला. मात्र, उपस्थित ग्रामस्थांच्यावतीने देशी दारूच्या दुकानास परवानगी देण्यासाठी बहुमत असल्याने पाच ग्रामस्थांनी आम्हालाही दुकान चालविण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी अर्ज दाखल करण्यात आला.

गावाबाहेर हवीय परवानगी

तोंडापूर हे बाजार पेठचे मोठे गाव असून, गावात बसस्थानकावर व अवैध दारुची सर्रासपणे विक्री होत असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासी व शाळकरी मुलांना महिलांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे गावाच्या बाहेर देशी दारुच्या दुकानाला रितसर परवानगी देण्याचा विषयावर चर्चा करण्यात आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com