ऑनलाइन लोकअदालतीत पाच हजार खटले निकली

ऑनलाइन लोकअदालतीत पाच हजार खटले निकली
ऑनलाइन लोकअदालतीत पाच हजार खटले निकली

जळगाव : लॉकडाऊनमुळे न्यायालयीन प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाल्याने अनेक जण हे न्यायाप्रक्रियेपासून दूर राहिले होते. याकरिता जिल्ह्या न्यायालयाचने ऑनलाईन आणि ऑफलाईन लोक अदालतीचे आयोजन केले होते. यात ऑनलाइन पद्धतीने एकाच दिवशी पाच हजार खटले निकाली काढण्यात आले. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. (Jalgaon-news-five-thousand-cases-solve-jalgaon-court-lokadalat)

कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणणे प्रचलित आहे. कारण एकदा का न्यायलायत प्रकरण गेले की अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रियेसाठी कोर्टाचे खेटे घालावे लागतात. उमेदीच्या काळातील अनेक वर्षे यात वाया जात असल्याने, वेळेत न्याय न मिळत नाही. त्यात गेल्या दीड वर्षपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसह अनेक निर्बंध असल्याने प्रत्यक्ष न्यायलायत हजर राहून काम करणे हे सर्वांचसाठी अडचणीचे होते. त्याचा परिणाम न्यायालयीन प्रक्रियेवर सुद्धा झाला. न्यायलाइन कामकाज अतिशय धीम्या गतीनं सुरू असल्याने अनेक खटले रखडले गेल्याने न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेला मोठ्या हाल अपेस्था सहन कराव्या लागत होत्या. यावर उपाय म्हणून जिल्हा न्यायालयाच्या विधी सेवा विभागाने सर्व सामान्य जनतेला न्याय प्रक्रियेत सहज सहभागी होता यावं यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने लोकअदालतीचे आयोजन केले होते.

पाच हजार खटले निकाली

ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तब्बल पाच हजार खटले हे एकाच दिवशी निकाली काढण्यात आल्यानं अनेकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. ऑनलाईन न्याय प्रक्रियेत देशाच्या विविध भागातून पक्षकार सहभागी झाल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रासातून सुटका झाली असल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

तीन कोटी रक्कम वसूल

पाच हजार खटल्यात जवळपास तीस कोटीहुन अधीक रक्कम वसूल करण्यात येऊन तिचे लाभार्थीना वाटप केले गेल्याने अनेकांची अडकलेले अर्थचक्र ही सुरळीत झाले आहे, लोक अदालतमध्ये देण्यात आलेला निकाल हाे कायमस्वरूपी मानला जात असतो या निकालानंतर परत कोणत्याच न्यायालयात याचिका दाखल करता येत नसल्याने न्याय पालिकेवर असलेल्या कामाचा ताण देखील मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या विचार केला तर वेळ पैसा आणि रखडलेल्या न्यायालयीन प्रक्रिये मुळे होणार मानसिक त्रास वाचणार असल्याने जनतेने लोक अदालती मध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन विधी सेवा सचिव ए ए शेख यांनी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com