ह्रदयद्रावक..आईची मुलासह विहिरीत उडी घेत आत्‍महत्‍या

ह्रदयद्रावक..आईची मुलासह विहिरीत उडी घेत आत्‍महत्‍या
ह्रदयद्रावक..आईची मुलासह विहिरीत उडी घेत आत्‍महत्‍या
Suicide

जळगाव : अंतुर्ली (पाचोरा) येथील महिलेने मुलासह विहिरीत उडी घेत आत्‍महत्‍या केली. दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्‍यानंतर सदर घटना उघडकीस आली. (jalgaon-news-fly-to-the-well-to-mother-and-child-suicide-well)

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे बुधवारी रात्री आठच्‍या सुमारास विवाहित युवकासह त्याच्या आईने गावालगतच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मयत युवकाचे नाव नितीन पंढरीनाथ पाटील (वय २४) व त्याच्या आईचे नाव प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय ४५) आहे.

Suicide
सावधान.. रुग्णवाढ देतेय तिसऱ्या लाटेचे संकेत

घरची परिस्थितीही समाधान कारक

मयत नितीन यास शेती असून तो चांगल्या प्रकारे शेती व्यवसाय करत होता. त्याची घरची आर्थिक परिस्थितीही समाधान कारक आहे. त्याची पत्नी व आईही त्यास शेती व्यवसायात मदत करीत असत, असे असताना त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत आहे.

मृतदेह तरंगताना दिसले

दोघा मायलेकांचे मृतदेह गुरुवारी सकाळी गावालगतच्या विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळले, त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. माय लेकाच्या आत्महत्येचे गुढ ग्रामस्थांपुढे आहे. विहीरीत पट्टीच्या पोहणाऱ्यांनी प्रथम आईचे प्रेत काढले. नंतर मुलाचे प्रेत गवसले. या घटनेमूळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com