Fraud: नोकरीचे आमिष दाखवत युवकाची सव्‍वापाच लाखाची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवत युवकाची सव्‍वापाच लाखाची फसवणूक
Fraud Case
Fraud CaseSaam tv

निंभोरी (जळगाव) : नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत युवकाकडून वारंवार पैशांची मागणी करत 5 लाख 25 हजार रुपयात गंडविण्याची घटना घडली आहे. आपली (Fraud) फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच युवकाने दोन जणांविरुद्ध (Pachora) पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. (Jalgaon News Fraud Case)

Fraud Case
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षाची सक्त मजुरी

आखतवाडे (ता. पाचोरा) येथील गणेश मोतीलाल गढरी (वय 32) यांना शिपाई पदावर नोकरी लावून देतो; असे सांगत गणेश गढरी यांचे चुलत मामा जगन गंगाराम पवार (रा. मोहलाई, ता. सोयगाव जि. औरंगाबाद) यांचे परिचयातील सागर रतन बागुल (रा. एकलहरे, ता. जि. नाशिक) व एस. पी. बोडखे (रा. डोंबिवली ता. कल्याण जि. ठाणे) यांचेशी गणेश गढरी यांची ओळख करुन दिली. दरम्यान आपणास नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत 19 मार्च 2021 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत गणेश गढरी यांचेकडून सागर बागुल यांनी त्यांच्या फोन पे वर वारंवार पैशांची मागणी करत 5 लाख 25 हजार रुपये घेतले.

अखेर पोलिसात धाव

गणेश गढरी यांनी सागर बागुल व एस. पी. बोडखे यांना नियमित फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सागर बागुल यांचा मोबाईल बंद तर एस. पी. बोडखे हे ठराविक कालावधीत मागून पैसे देतो, असे सांगत वेळ मारुन नेली. त्यामुळे गणेश गढरी यांनी सोमवार (23 ऑगस्ट) पाचोरा पोलिस स्टेशन गाठत सागर बागुल व एस. पी. बोडखे यांचे विरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे‌. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com