Jalgaon Fraud Case: नोकरीच्या आमिषाने फसवणूक; १५ लाख गंडविले

Jalgaon Fraud : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; १५ लाख गंडविले
Fraud Case
Fraud CaseSaam tv

पाचोरा (जळगाव) : येथील तलाठी कॉलनीतील रहिवासी व शेती काम करणाऱ्या प्रवीण हरी शिंदे या युवकाकडून लष्करात (Fraud) नोकरी लावून देण्याच्या आमिषाने १५ लाख १६ हजार रुपये लाटल्याप्रकरणी नाशिक (Nashik) येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

Fraud Case
Heat Wave: जळगाव, नंदूरबारमध्‍ये तापमानाने गाठला उच्चांक

प्रवीण शिंदे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. लष्करात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत नाशिक येथील रामकृष्ण शंकर राऊत यांनी प्रवीण शिंदे व त्‍यांच्‍या भावाकडून २० ऑगस्ट २०१९ ते १४ सप्टेंबर २०२० दरम्यान १५ लाख १६ हजार रुपये लाटले. ही रक्कम (Jalgaon News) रामकृष्ण राऊत यांच्या बँक खात्यात वेळोवेळी जमा केली. परंतु तीन वर्षे झाले तरी नोकरी नाही व पैसेही परत नाही.

Fraud Case
Accident News: दुचाकीला धडक देत भरधाव कार पुलाखाली कोसळली; सात जण गंभीर जखमी

त्यामुळे संशय आल्‍याने पैशांची मागणी केली. राऊत याने उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पाचोरा पोलिसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com