गणेश मंडळांना यंदाही मिळणार अधिकृत वीज कनेक्‍शन

गणेश मंडळांना यंदाही मिळणार अधिकृत वीज कनेक्‍शन
गणेश मंडळांना यंदाही मिळणार अधिकृत वीज कनेक्‍शन
Light Connection

जळगाव : सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे; त्या मंडळांच्या मागणीनुसार महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत आहे. तसेच या तात्पुरत्या जोडणीच्या वीजवापरासाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. (jalgaon-news-Ganesh-festival-ganesh-Mandals-will-get-official-electricity-connection-mahavitaran)

गणेशोत्सवाची तयारी सर्वदूर सुरू आहे. गणेश मंडळाचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने जास्‍त गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावले आहेत. यामुळे उत्‍सव लहान स्‍वरूपातच साजरा केला जाणार आहे. तरी देखील मोठ्या मंडळांकडून आकर्षक रोषणाई केली जाणार असल्‍याने त्‍यांना महावितरणकडून अधिकृत वीज कनेक्‍शन देण्यात येत आहे.

महावितरणचे आवाहन

गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे आर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युतप्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्विच बोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.

Light Connection
पुराने गावाचा संपर्क तुटला; अन्‌ इकडे आरूषीचा आयुष्‍याशी कायमचा!

तर होणार कारवाई

गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. याकरीता जवळच्‍या कार्यालयात जावून तात्‍पुरता कनेक्‍शन करून घ्यावे. हे कनेक्‍शन घरगुती वीज दरानुसार दिले जाणार आहे.

चोवीस तास सेवा

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे. विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेल्या १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com