गुन्‍हा लपविण्यसाठी चक्‍क भाड्याचे ‘बाळ’ घेत आला पोलिसांत

गुन्‍हा लपविण्यसाठी चक्‍क भाड्याचे ‘बाळ’ घेत आला पोलिसांत
Kidnaping case
Kidnaping case

जळगाव : मामाकडे राहायला आलेल्या १४ वर्षीय युवतीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होताच संशयित मुलाने स्वतःहून अमरावती पोलिस आयुक्त कार्यालय गाठले. अपहृत मुलगी व तिच्याजवळ नवजात बाळ असे घेऊन सहाय्यक पोलिस आयुक्तांना वयोमान पूर्ण असल्याचे दस्तऐवज दाखवत ‘शेंडी’ लावल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिपेठ पोलिसांनी खरा प्रकार समोर आणून संशयितांना अटक केली. मुलीने घरून आणलेल्या सहा तोळ्यांपैकी निम्मे सोनेही जप्त करण्यात आले. (jalgaon-news-girl-kidnaping-case-came-to-the-police-with-a-hired-baby-to-cover-up-the-crime)

अमरावती येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी जून महिन्यात जळगाव शहरात शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मामाकडे वास्तव्यासाठी आली होती. या अल्पवयीन मुलीला प्रेमप्रकरणातून संशयित भारत चावरे याने पळवून नेल्याची घटना २९ जूनला घडली होती. शनिपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित भारत चावरे (वय २१, रा. छोटा भिलपुरा, अमरावती) या तरुणाला १९ ऑगस्टला अमरावती येथून शनिपेठ पोलिसांनी अटक केली.

बनावट कागदपत्रांवर मुलीसोबत लग्‍न

मुलीस पळवून नेत बनावट कागदपत्रांच्या आधारावर तिच्यासोबत लग्न केले, तसेच तिच्यावर अत्याचार केल्याचेही समोर आले होते. तसेच या गुन्ह्यात संशयित भारत याच्यासह त्याच्या आई व भावांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. गुन्ह्यात संशयित संदीप राजा चावरे फरारी आहे, तर बालसुधारगृहात दाखल केलेल्या अल्पवयीन पीडितेलाही समुपदेश करून तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Kidnaping case
चाळीसगाव परिसरात ढ़गफुटी; वाकडी शिवारातून दोनशे गुरे वाहिली

नकली कागदपत्रे अन्‌ उधारीचे बाळ

संशयित भारतने बनावट कागदपत्राच्या आधारावर लग्न झाल्याचे दाखविले आहे. तसेच पीडित मुलीजवळ लहान बाळ देऊन त्याद्वारे सज्ञान असल्याचे भासवत सहाय्यक पोलिस आयुक्तांचीही दिशाभूल केल्याचे तपासात समोर आले. मात्र शनिपेठ पोलिसांनी कागदपत्रांच्या आधारावर मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com