हातावरची मेहंदीही पुसली नाही; लग्‍नाच्‍या दहाव्‍याच दिवशी नवविवाहितेची आत्‍महत्‍या

हातावरची मेहंदीही पुसली नाही; नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
हातावरची मेहंदीही पुसली नाही; लग्‍नाच्‍या दहाव्‍याच दिवशी नवविवाहितेची आत्‍महत्‍या
suicide

जळगाव : लग्‍नाला अवघे दहा दिवस झालेले..संसाराची अजून सुरवातच झाली असताना, हातावरची मेहंदी पुसण्या अगोदरच विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील दांडेकरनगर परिसरात घडली. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समजले नसून पोलीस तपास करत आहेत. (jalgaon-news-girl-suicide-after-marriage-ten-days)

न्हावी (ता. यावल) येथील माहेर असलेल्या करीना सागर निकम (वय १९) या तरूणीचा विवाह गेल्‍या आठवड्यात ११ जुलैला जळगावातील दांडेकरनगरामधील सागर निकम याच्याशी झाला होता. नवविवाहितेच्‍या हातावरची मेहंदी देखील पुसलेली नसताना आज सकाळी अकराच्या सुमारास घरात कुणी नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली.

suicide
लसीकरण केंद्र दोन दिवस बंद; जळगावात करावी लागतेच प्रतिक्षा

आत्‍महत्‍येचे कारण गुलदस्‍त्‍यात

करीनाने विवाहाच्‍या दहाव्‍या दिवशीच आत्‍महत्‍ये पाऊल उचलले. करीना सागर निकम हिने आज सकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी सासरे राजू निकम, पती सागर निकम हे कामावर गेले होते. तर दिर नागेश घरात झोपलेला होता. सासुबाई निर्मलाबाई निकम बाहेरून आल्‍यानंतर त्‍यांना करीनाने गळफास घेतल्‍याचे दिसून आले. त्‍यांनी आरडाओरड केल्‍यानंतर नागरीक जमा झाले. याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com