
जळगाव : मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर स्थीर होते. आता पुन्हा या दरात मोठी मुसंडी घेतल्याचे पहावयास मिळत असून आतापर्यंतचा (Gold And Silver) उच्चांकी दर झाला आहे. स्थानिक बाजारात शुद्ध सोने (२४ कॅरेट) आज ५८ हजार ७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. आतापर्यंतची ही नवी विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. (Maharashtra News)
सोने व चांदीच्या दरात मागील महिन्यात (Gold Price Today) सातत्याने वाढ होत होती. चांदीचा दर देखील आर्थिक वर्षात दोन वेळेस ७० हजारांवर पोचला होता. चांदीने देखील उच्चांक गाठला असून सोने देखील मागील दोन– अडीच वर्षात उच्चांकी दरावर पोहचले आहे. या दरम्यान मागील महिन्या दीड महिन्यात सोने दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
नव वर्षात सोने– चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे. गेल्या १५ दिवसांत सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची झळाळी आली आहे. सोन्याचा दर जीएसटीसह ५८ हजार ८०० वर पोचला आहे; तर चांदीचा दर जीएसटीसह ७२ हजार १०० वर पोचला. तर दुसरीकडे सोन्याचे दागिने (२२ कॅरेट)चा भाव वाढून ५३ हजार ७८० रुपये प्रति १० ग्रॅमच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.